जाहिरात

DMart VIDEO: डीमार्टमध्ये जात असाल तर सतर्क राहा! एक चूक महागात पडेल

Thane Viral Video: ठाण्यातील ढोकळी येथील डी-मार्टमध्ये मुदत संपलेले (Expired) केक विकले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

DMart VIDEO: डीमार्टमध्ये जात असाल तर सतर्क राहा! एक चूक महागात पडेल

Thane Dmart VIral Video: ग्राहकांच्या विश्वासाला तडा देणारी एक घटना ठाणे पश्चिम येथील ढोकळी परिसरातील डी-मार्ट (DMart) आउटलेटमध्ये घडली आहे. या ठिकाणी मुदत संपलेले केक चक्क विक्रीसाठी ठेवण्यात आले होते. विशेषतः लहान मुले आवडीने खात असलेल्या खाद्यपदार्थांबाबत ही निष्काळजी समोर आल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

नेमका प्रकार काय?

सोशल मीडियावर 'ठाणे 24 तास' या इन्स्टाग्राम पेजवरून एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. यामध्ये 'ब्रिटानिया गोबल्स फ्रुटी फन बार केक'चे पाकीट दिसत असून, त्याची मुदत (Expiry Date) 19 एप्रिल रोजीच संपल्याचे स्पष्ट दिसत आहे. मात्र, तरीही हे उत्पादन 2 मे पर्यंत शेल्फवर विक्रीसाठी उपलब्ध होते. केवळ एकच नाही, तर संपूर्ण बॅच मुदत संपलेली असल्याचे व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे.

VIDEO

(नक्की वाचा- Virar Railway Station Protest: प्रवासी ट्रॅकवर उतरले, लोकल रोखली; विरार स्थानकात फुल राडा! नेमकं काय घडलं?)

केक खाल्ल्याने प्रकृती बिघडल्याचा दावा

व्हायरल व्हिडिओ 2 मे रोजी चित्रित करण्यात आला आहे. संबंधित ग्राहकाने 30 एप्रिल रोजी हा केक विकत घेतला होता, ज्याचे बिलही त्यांनी सादर केले आहे. हा केक खाल्ल्यानंतर पोटदुखीचा त्रास झाल्याची तक्रार ग्राहकाने केली आहे. यावेळी डी मार्ट कर्मचारी आणि ग्राहक यांच्या जोरदार राडा झाल्याचं पाहायलं मिळालं. 

(नक्की वाचा-  Toll Plaza News: मुंबईच्या वेशीवरील 'हा' टोल नाका पुन्हा सुरु होणार? वाहनांकडून होणार वसुली)

पोलीस घटनास्थळी दाखल

घटनेची माहिती मिळताच दोन पोलीस कर्मचारी डी-मार्टमध्ये दाखल झाले. "मुदत संपलेली उत्पादने तपासली का जात नाहीत?" असा सवाल पोलिसांनी कर्मचाऱ्यांना केला. पोलिसांनी दोन्ही बाजूंना पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यास सांगितले आहे. अद्याप याप्रकरणी अधिकृत एफआयआर (FIR) दाखल झाला आहे की नाही, हे स्पष्ट झालेले नाही.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com