Dadar kabutar Khana: दादर पुन्हा तापणार? मराठी एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना नोटीस

Dadar kabutar Khana News : मुंबईतील कबुतरखान्याच्या मुद्यावर मराठी भाषिकांना एकत्र करण्याच्या प्रयत्नाला पोलिसांनी धक्का दिलाय.

जाहिरात
Read Time: 2 mins
Dadar kabutar Khana: मराठी एकीकरण समिती या विषयावर आंदोलन करणार आहे.
मुंबई:


Dadar kabutar Khana News : मुंबईतील कबुतरखान्याच्या मुद्यावर मराठी भाषिकांना एकत्र करण्याच्या प्रयत्नाला पोलिसांनी धक्का दिलाय. दादरमधील कबुतरखाना हटवण्याचा मुद्दा आता मराठी एकीकरण समितीनं हाती घेतलंय. त्यांनी या विषयावर बुधवारी (13 ऑगस्ट) आंदोलन करण्याची हाक दिली आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मराठी एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी नोटीस बजावली आहे. 

दादरमधला कबुतरखाना कायमस्वरुपी बंद करावा या मागणीसाठी इथं बुधवारी समितीकडून आंदोलन केलं जाणार आहे. तसंच या विरोधात आंदोलन करुन न्यायालयाचा अवमान करणाऱ्यांवर कारवाई करावी, या मागणीचं निवेदन समितीच्या वतीनं बुधवारी पोलिसांना दिलं जाणार आहे. याच विषयावर आंदोलनासाठी समितीनं बुधवारी दादरमध्ये एकत्र यावं असं आवाहन सोशल मीडियाच्या माध्यमातून समितीनं केलं होतं. त्यानंतर पोलिसांनी ही नोटीस बजावली आहे. 

( नक्की वाचा : Dadar kabutar Khana: ना पक्ष ना नेता ना झेंडा! आता मराठी माणूस दाखवणार आपली ताकद )

कबुतरांना खाऊ घालणं सुरुचं

दरम्यान कबुतरांना सार्वजनिक ठिकाणी खाद्य देण्यास उच्च न्यायालयानं बंदी घातली आहे. त्यानंतरही दादरमधील कबुतरखाना परिसरात कबुतरांना खाऊ घालण्याचे प्रकार सुरु आहेत. येथील एका इमारतीवर कबुतरांना खाणं टाकण्यात येत आहे. या आंदोलनाचं केंद्र असलेल्या दादरमधील कबुतरखाना परिसरातीलच ही इमारत आहे. या इमारतीत कबुतरांना खाऊ घालण्यासाठी आग्रही असलेले जैन समाजाचे लोकं राहतात. 

( नक्की वाचा : Pune Kabutarkhana : मुंबईनंतर पुण्यातही कबुतरांच्या खाण्यावरील बंदीचा वाद चिघळला, काय आहे कारण? )

जैन समाजाची भूमिका काय?

 मुंबईतील कबूतरखान्यावरून सुरु झालेल्या वादानंतर जैन समाजाकडून उच्चस्तरीय बैठक घेतली जाणार आहे. या प्रकरणात 13 ऑगस्ट रोजी उच्च न्यायालयत सुनावणी होणार आहे. ही सुनावणी पार पडल्यानंतर जैन समाजातील विविध संघटना, पदाधिकारी एक बैठक घेणार आहेत. या बैठकीत कबूतर खाण्यासंदर्भात सुरू असलेल्या  विषयावर चर्चा होईल. या बैठकीनंतरच अधिकृतपणे जैन समाज त्यांची भूमिका मांडणार आहे.  जैन समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष ललित गांधी यांनी ही माहिती दिली आहे.