- फरीदाबाद टेरर मॉड्यूल मामले में गिरफ्तार डॉ. शाहीन के महाराष्ट्र कनेक्शन की जांच की जा रही है.
- शाहीन के महाराष्ट्र से जुड़े होने की खबर के बाद महाराष्ट्र सुरक्षा एजेंसियां अलर्ट मोड पर हैं.
- महाराष्ट्र ATS ने ठाणे जिले के मुंब्रा में एक शिक्षक के घर पर रेड कर आतंकियों से संबंध की जांच शुरू की है.
दिल्लीतील लाल किल्ल्याजवळील कार स्फोट आणि फरीदाबाद येथे उघडकीस आलेल्या दहशतवादी मॉड्यूलच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभरातील सुरक्षा यंत्रणा हाय अलर्टवर आल्या आहेत. फरीदाबादमध्ये शस्त्रास्त्रे बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आलेली डॉ. शाहीन हिच्या महाराष्ट्र कनेक्शनची माहिती समोर आल्याने, महाराष्ट्र सुरक्षा एजन्सी देखील अधिक सक्रीय झाल्या आहेत.
डॉ. शाहीनचं महाराष्ट्र कनेक्शन
सुरक्षा एजन्सीतील सूत्रांनुसार, डॉ. शाहीनने महाराष्ट्रात राहणाऱ्या एका व्यक्तीशी विवाह केला होता. या माहितीची पुष्टी केली जात आहे. उपलब्ध माहितीनुसार, शाहीनचा निकाह जफर हयात नावाच्या तरुणासोबत झाला होता, परंतु 2015 साली त्यांचा घटस्फोट झाला. डॉ. शाहीनचा दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याचा संशय तपासामध्ये पुढे येत आहे. त्यामुळे, महाराष्ट्रातील सुरक्षा एजन्सी अलर्ट झाल्या असून, दोन्ही राज्यांमध्ये या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे.
दिल्ली स्फोटातील नवीन खुलासे
दिल्लीतील स्फोटाची तपासणी करणाऱ्या एफएसएल (FSL) टीमला दोन मोठे पुरावे मिळाले आहेत. घटनास्थळी दोन जिवंत काडतुसे सापडली आहेत. हे काडतुसे जखमींना मदत करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांचे तर नाहीत ना, याची तपासणी सुरू आहे. एफएसएलला दोन प्रकारच्या स्फोटकांचे नमुने मिळाले आहेत. पहिला नमुना संभाव्य अमोनियम नायट्रेट असल्याचा अंदाज आहे, तर दुसरा स्फोटक नमुना अमोनियम नायट्रेटपेक्षा अधिक घातक आहे. या दुसऱ्या स्फोटकाचा प्रकार निश्चित करण्यासाठी तपास सुरू आहे.
महाराष्ट्र एटीएस ॲक्शन मोडवर
दिल्लीतील बॉम्बस्फोटानंतर महाराष्ट्र एटीएस ॲक्शन मोडवर आली आहे. एटीएसने आज पहाटे ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा परिसरातील कौसा विभाग येथील एका शिक्षकाच्या घरावर छापा टाकला आणि शोध मोहीम राबवली. काही दिवसांपूर्वी पुणे एटीएसने ताब्यात घेतलेल्या आरोपींनी मुंब्रा येथील या शिक्षकाशी ओळख असल्याचा दावा केला होता. एटीएस पथकाने शिक्षकाच्या घरातून लॅपटॉप, मोबाईल फोन आणि संगणकाचे इतर साहित्य जप्त केले आहे.