अमजद खान
मुंबईत अनेक जण पोटापाण्यासाठी देशभरातून येत असतात. पैसे कमवतात आणि आपलं कुटुंब चालवतात. मेहनत करणाऱ्यांना मुंबई कधीही नाकारत नाही. त्यामुळे मुंबईत येणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून इथं लोक येतात. अनेक जण आपल्या मेहनतीच्या जोरावर मोठेही होतात. पण काही जण असे असतात की ते आपल्या सवयीतून बाहेरच पडतच नाहीत. शेवटी नको तेच त्यांच्या बरोबर होते. अशीच काहीशी घटना दिल्लीतल्या जोगिंदर लबाना याच्या बरोबर झाली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
जोगिंदर लबाना हा मुळचा दिल्लीचा रहीवाशी आहे. दिल्लीत तो ट्रेनमध्ये चोरी करायचा. तिथे अनेक कारनामे केल्यानंतर त्याने मुंबईला जाण्याचं ठरवलं. त्यासाठी त्याने दिल्ली सोडली. मुंबईत तो कल्याणला आला. कल्याणला आल्यानंतर त्याने तिथे एका मुलीशी लग्न केले. त्यानंतर कल्याणमध्ये त्याने रिक्षा चालवण्याचे काम केले. सुरूवातीच्या काळात त्याने रिक्षा चालवली. त्याला दोन मुलंही झाली.
ट्रेंडिंग बातमी - धक्कादायक! एकाच पद्धतीनं झाल्या 9 महिलांच्या हत्या, मारेकरी मोकाट! सीरिअल किलरची सर्वत्र दहशत
पण त्याची जुनी सवय त्याचा पिच्छा सोडत नव्हती. त्याला दारूचे व्यसन होते. ते त्याला सोडता आले नाही. तो दारूच्या आहारी गेला. दारू बरोबरच जुगारही खेळू लागला. हे करत असताना रिक्षा चालवण्याचे त्याने सोडून दिले. रिक्षा चालवत नसल्याने त्याला पैसे मिळेना झाले. दुसरीकडे दारूचे व्यसन आणि जुगार खेळण्याची लागलेली सवय या कात्रीत तो सापडला होता. त्याला आर्थिक चणचण भासत होती.
ट्रेंडिंग बातमी - सायको किलर! महिलांना शरीर संबध ठेवण्यास सांगायचा, नकार देताचं भयंकर करायचा
पैसे कसे कमवायचे याबाबत त्याच्या डोक्यात चक्र सुरू होती. काम करत नव्हता. त्यामुळे सहज पैसे कसे मिळतील याचा विचार तो करत होता. त्यातून त्याला त्याच्या जुन्या कामाची आठवण झाली. दिल्लीत तो चोरी करायचा. तेच काम मग त्याने कल्याणमध्ये सुरू केले. लोकलमधील गर्दी असो की तिकीट काउंटर असो तो तिथे मोबाईल चोरू लागला. कल्याणमध्ये ज्या ठिकाणी गर्दी असायची त्या गर्दीत तो शिरत होता. मिळेल ते चोरत होता. एक दिवस कल्याण रेल्वे स्टेशनमध्ये त्याने एका उच्चपदस्थ महिलेचा मोबाईल चोरला.
ट्रेंडिंग बातमी - विधानसभा निवडणुका कधी होणार? पाटलांनी तारखेसह महिनाही सांगितला
त्याच वेळी कल्याण रेल्वे पोलिस ठाण्यात चोरीच्या तक्रारी वाढल्या होत्या. शेवटी कल्याण पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावण्याचे ठरवले. त्यांनी सीसीटीव्ही फुटेज चेक केले. त्यात मोबाईल चोरणार दिसून आला. खबऱ्यांना याबाबत माहिती देण्यात आली. सीसीटीव्ही मध्ये दिसणारा चोर हा अंबरनाथमध्ये रिक्षा चालवत असल्याची माहिती मिळाली. मात्र त्याच वेळी तो उल्हासनगरला येत असल्याचे पोलिसांना समजले. त्यांनीही तातडीने सापळा रचला. तिथे तो आला. पोलिसांनी त्याची झडती घेतली. त्यावेळी त्याच्याकडे काही मोबाईल फोन दिसून आले. त्यात त्या महिलेचा महागडा फोनही दिसून आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. अशा प्रकारे जोगिंदरचा खेळ खल्लास झाला.