रामदास कदम आणि रवींद्र चव्हाण यांच्यातील मुंबई-गोवा हायवेवरून सुरू झालेल्या वादामुळे महायुतीत बिघाडी सुरू झाल्याचं चित्र आहे. रामदास कदम यांनी घरचा आहेर देत भाजप नेत्यांवर टीका केली आहे. याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारलं असता त्यांनी संताप व्यक्त केला.
रामदास भाई वारंवार टोकाचं बोलतात. त्यामुळे आमचीही मनं दुखावली जातात. आम्हीही माणसं आहोत. त्याच्या उत्तरादाखल आम्हालाही बोलता येतं. त्यामुळे मोठ्या नेत्यांनी काही पथ्य पाळायला हवीत. वारंवार भाजपला असं बोलणं आम्हाला मान्य नाही. यासंदर्भात मी स्वत: मुख्यमंत्री शिंदेंशी बोलेन, असं फडणवीस यावेळी म्हणाले. रामदास कदम ज्याप्रकारची वक्तव्य करतात, अशा प्रकारे आरोप करणं कुठल्या युतीधर्मात बसतं? त्यामुळे रामदास भाईंचं काही म्हणणं असेल तर त्यांनी अंतर्गत मांडायला हवं. अशा प्रकारे प्रत्येकवेळी भाजपच्या नेत्यांना वेठीस धरणं यातून चांगली भावना तयार होत नाही. त्यामुळे भाईंचं म्हणणं मी समजून घेईल आणि मार्ग काढण्याचा प्रयत्न करेन, असंही ते म्हणाले.
बातमी अपडेट होत आहे.