मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसाठी आजचा दिवस खऱ्या अर्थाने शुभ ठरला. त्यांच्यासाठी दोन आनंदाच्या गोष्टी घडल्या. एक म्हणजे फडणवीसांची लेक दिविजा हिनं दहावीच्या परिक्षेत घवघवीत यश मिळवलं. तर दुसरं म्हणजे बहुप्रतिक्षित असा त्यांचा वर्षा बंगल्यावरचा गृहप्रवेश ही आज झाला. त्यामुळे फडणवीस कुटुंबायांसाठी आजचा दिवस हा विशेष आनंदाचा ठरला आहे. त्यातही दिविजाने दहावीत नुसते पास होवून दाखवले नाही तर तिने मिळवलेले गुण ही कौतूकास्पद आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
आपल्या लेकीच्या यशा बद्दल अमृता फडणवीस यांनी ट्वीट केले आहे. त्या म्हणतात सर्वांना अक्षय तृतीयेनिमित्त हार्दिक शुभेच्छा. आजच्या शुभमुहूर्तावर वर्षा या निवासस्थानी आम्ही छोटीशी पूजा संपन्न करीत गृहप्रवेश केला. आजच्या दिवशीची आणखी एक अत्यंत आनंदाची बातमी आपल्या सर्वांना सांगताना मन खुशीने भरून गेलंय, आमची सुकन्या दिविजा ही 10 वी च्या बोर्ड परीक्षेत 92.60 टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाली आहे.
ट्रेंडिंग बातमी - Eknath Shinde in Daregaon: एकनाथ शिंदे पुन्हा दरेगावात दाखल, यावेळी कारण काय?
दहावीचे वर्ष महत्वाचे मानले जाते. अनेक पालकांना आपल्या पाल्याची काळजी असते. त्यांना दहावीत किती गुण मिळतात याकडे त्यांचे विशेष लक्ष असते. वर्षभर विद्यार्थी आणि पालक हे मेहनत घेत असताता. निकाला दिवशी त्याचे फळ त्यांना मिळते. दिविजा ही दहावीत होती. शिवाय हे वर्ष निवडणुकीच्या धामधूमीचे होते. त्यावेळी देवेंद्र फडणवीस हे सागर बंगल्यावर राहात होते. दिविजाच्या अभ्यासासाठी त्यांनी त्यावेळी सागर सोडून वर्षावर येण्याचे टाळले होते.
आजच्याच दिवशी त्यांनी वर्षा बंगल्यात प्रवेश केला. त्याच दिवशी दिविजाच्या परिक्षेचा निकाल ही लागला. हा योगायोगच म्हणावा लागले. दिविजाने तब्बल 92.60 टक्के गुण मिळवले आहे. तिच्या या यशाचं सर्वच स्तरातून कौतूक होत आहे. आता दिविजा पुढे काय करणार याची चर्चा सुरू झाली आहे. मात्र लेकीच्या यशाने मुख्यमंत्री फडणवीस आणि अमृता फडणवीस यांनी आनंद व्यक्त केला आहे.