जाहिरात

Eknath Shinde in Daregaon: एकनाथ शिंदे पुन्हा दरेगावात दाखल, यावेळी कारण काय?

Eknath Shinde News : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा एकदा त्यांच्या दरेगावात दाखल झाले आहेत. एका धार्मिक कार्यक्रमानिमित्त एकनाथ शिंदे दरेगावात पोहोचले आहेत.

Eknath Shinde in Daregaon: एकनाथ शिंदे पुन्हा दरेगावात दाखल, यावेळी कारण काय?

राहुल तपासे, सातारा

Satara News : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साताऱ्यातील दरेगावात गेले की चर्चेचा विषय होतो. महायुतीत एकनाथ शिंदे नाराज असले की दरेगावात जातात, असा आरोप विरोधकांकडून सातत्याने केला जातो. शिवसेनेच्या नेत्यांकडून हे दावे खोडूनही काढले जातात. विरोधकांच्या टीका सुरु असल्यातरी मात्र एकनाथ शिंदे यांचं दरेगाव प्रेम कायम आहे.  

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा एकदा त्यांच्या दरेगावात दाखल झाले आहेत. एका धार्मिक कार्यक्रमासाठी एकनाथ शिंदे येथे आल्याची माहिती आहे. मंदिराच्या एका धार्मिक कार्यक्रमानिमित्त ते आज दरेगावात आले असून हा कार्यक्रम आटोपल्यानंतर लगेच ते पुन्हा हेलिकॉप्टरने मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहेत.

शिंदेंच्या दरेगाव दौऱ्यांवर काय म्हणाले होते शिवेंद्रराजे भोसले?

'NDTV मराठी मंच' या कार्यक्रमात बोलताना शिवेंद्रराजे भोसले यांनी म्हटलं की, "उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दरेगावी आले की नाराज आहेत असं बोलणे चुकीचं आहे. हे सगळं स्क्रीनवर तयार केलेलं वातावरण आहे. आम्ही तिथे त्यांना भेटायला जातो. आम्ही गेलो की ते आम्हाला त्यांची शेती दाखवतात. एकनाथ शिंदे नाराज असते तर आम्हाला कुणालाच भेटले नसते. प्रत्येकजण आपल्या गावी जातो. त्यामुळे ते गावी आल्याने त्याची वेगळी चर्चा करण्याचं कारण नाही, असं मला वाटतं."

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: