
अमजद खान
काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात लोकांचे जीव गेले. संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर काही ठिकाणी अल्पसंख्याक समाजाच्या बाबतीत काही कृत्य केले जात असल्याचे समोर आले आहे. त्यातील एक डोंबिवलीनजीक असलेल्या कल्याण ग्रामीण परिसरातून समोर आले आहे. शिवसेना शिंदे गटाचे कल्याण ग्रामीण तालुका प्रमुख महेश पाटील यांचा सोशल मिडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यात त्यांनी पश्चिम बंगालमधील अल्पसंख्याक लोकांना गावे सोडून जाण्याचा इशारा दिला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
हा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर मानपाडा पोलिसांनी त्यांना नोटिस बजावली आहे. काही गैरकृत्य करु नका, नाही तर कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा पोलिसांनी दिला आहे. सोशल मिडियावर कल्याण ग्रामीण तालुका प्रमुख आणि युवा मोर्चा संघटक महेश पाटील यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला. ज्यात त्यांनी कल्याण ग्रामीणमधील उसाटणे आणि खोणी गावातील अल्पसंख्याक नागरीकांना त्वरीत गावे सोडून जाण्याचे सांगितले आहे. महेश पाटील यांच्या हा व्हिडीओ समोर आल्याने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
ते व्हिडिओत असे बोलत आहे की, पश्चिम बंगालच्या कोलकाता येथे राहणाऱ्या लोकांनी त्वरीत गावे सोडू न जा, नाही तर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल. त्याच व्हिडिओत काही कार्यकर्ते रस्त्याच्या बाजूला असलेल्या दुकानदारांना मारहाण करताना दिसत आहेत. शिवाय काही नागरीकांना पकडताना दिसत आहेत. सोशल मिडियावर हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला. यानंतर मानपाडा पोलिासांनी शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी महेश पाटील यांना नोटिस बजावली आहे.
ट्रेंडिंग बातमी - Eknath Shinde in Daregaon: एकनाथ शिंदे पुन्हा दरेगावात दाखल, यावेळी कारण काय?
मानपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक विजय कादबाने यांचे म्हणणे आहे की, व्हिडिओ समोर येताच महेश पाटील यांना नोटिस बजावून सूचना देण्यात आली आहे. तुम्हाला काही बांगलादेशीबाबत माहिती असेल तर पोलिसांना कळवा. कायदा हाती घेऊ नका. कायदा हातात घेतला तर योग्य ती कारवाई केली जाईल. मात्र महेश पाटील यांना बांगलादेशी आणि पश्चिम बंगाल यातील अंतर लक्षात आले नसावे. त्यामुळे त्यांनी हे विधान केले असल्याचे बोलले जात आहे. परंतू पोलिसांनी अशा प्रकरणात गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे. कोणाच्या गैरकृत्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये याची काळजी घेतली पाहिजे, अशी भावना व्यक्त करण्यात आली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world