महाराष्ट्र विधानसभेचं विशेष अधिवेशन पार पडत आहे. नवनिर्वाचित सर्व आमदारांचा शपथविधी पार पडला आहे. तर राहुल नार्वेकर यांची आज विधानसभा अध्यक्ष म्हणून एकमताने निवड केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबतचा प्रस्ताव मांडला. तर एकनाथ शिंदे, आशिष शेलार आणि राष्ट्रवादीच्या अनिल पाटील यांनी अनुमोदन दिले. अध्यक्षपदाच्या निवडीनंतरच्या पहिल्याच भाषणात देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे आभार मानले.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीबाबत बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलं की, "विरोधी पक्षाचे मी आभार मानतो. कारण महाराष्ट्रात काही अपवाद वगळता विधानसभा अध्यक्षांचा बिनविरोध निवड करण्याची परंपरा आहे. त्या पंरपरेचा मान राखत राहुल नार्वेकरांच्या निवडीला पूर्ण समर्थन विरोधी पक्षाने दिलं."
(नक्की वाचा- 'मविआ'ला विरोधी पक्षनेतेपद मिळण्याची दाट शक्यता; केजरीवाल सरकारचा फॉर्म्युला लागू होणार?)
अध्यक्ष महोदय तुम्ही पुन्हा येईल असं म्हणालं नव्हतं. तरीही तुम्ही परत आलात याबद्दल मला आनंद आहे. अध्यक्षपदाच्या खुर्चीला न्याय देण्याचं काम तुमच्याकडून होईल, यात मला तिळमात्र शंका नाही. नाना भाऊ यांचे विशेष आभार मानले पाहजेत. कारत तुम्ही वाट मोकळी केली त्यामुळे मागच्या वेळी ते अध्यक्ष बनू शकले. त्याच्या आधी त्यांना विधानपरिषदेत काम करण्याची संधी मिळाली होती, असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.
(नक्की वाचा: 'मी असताना राज ठाकरेंची गरज काय? रामदास आठवलेंचा रोखठोक सवाल)
मागील अडीच वर्षात विधानसभा अध्यक्षांकडे सर्व मीडिया आणि जनतेचं लक्ष होते. कदाचित राज्यातील सर्वाधिक चर्चेत राहिलेले अध्यक्ष देखील राहुल नार्वेकर होते. त्यांच्या रुपाने न्यायप्रिय, अभ्यासू, संयमी व्यक्तीमत्व अध्यक्षपदी निवडलं गेलं, ही आनंदाची गोष्ट आहे, असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. अडीच वर्षात राहुल नार्वेकर यांना मोठी कसरत करावी लागली. एकप्रकारे अग्नीपरीक्षा द्यावी लागली. आपल्या संपूर्ण ज्ञानाचा कसं लागला, याची आठवणगी देवेंद्र फडणीसांनी करुन दिली.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world