जाहिरात

'मी असताना राज ठाकरेंची गरज काय? रामदास आठवलेंचा रोखठोक सवाल

महायुती मनसेला सोबत घेणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत, यावरुनच केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी सर्वात महत्वाचे विधान केले आहे. नाशिकमध्ये ते माध्यमांशी ते बोलत होते.

'मी असताना राज ठाकरेंची गरज काय? रामदास आठवलेंचा रोखठोक सवाल

किशोर बालसरे, नाशिक: राज ठाकरे आणि आमचे विचार एकसारखे आहेत, त्यांना सरकारमध्ये ठेवण्यास आम्हाला नक्कीच रस आहे. त्यामुळे आगामी काळात शक्य तिथे आम्ही त्यांच्याशी युती करु.. असे मोठे विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या या विधानानंतर आता महायुती मनसेला सोबत घेणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत, यावरुनच केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी सर्वात महत्वाचे विधान केले आहे. नाशिकमध्ये ते माध्यमांशी ते बोलत होते.

काय म्हणालेत रामदास आठवले?

 'राज ठाकरे यांची हवा या निवडणुकीत गेली. आमच्या शिवाय सरकार येणार नाही असे ते बोलले होते. त्यांच्या सभेला गर्दी होते पण जागा येत नाहीत. राज ठाकरे युतीत येतील असे वाटत नाही, मी आहे तर त्यांची काय गरज? राज ठाकरे यांना घेणे योग्य ठरणार नाही. मुस्लिमविरोधी भूमिका घेणे योग्य नाही. शिवसेनेतून बाहेर पडून त्यांनी आपले रंग बदलले.  त्यात भगवे, निळा ,हिरवा रंग होते पण आता भगवा रंग हातात घेतला आहे,' असा टोला रामदास आठवले यांनी लगावला. 

महत्वाची बातमी: Farmer Protest : शेतकऱ्यांना शंभू बॉर्डरवर रोखलं, पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या सोडल्या, 4 जखमी

 'मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटलो. मंत्रिमंडळ विस्तारात रिपब्लिकन पक्षाला स्थान मिळावे, महामंडळ मिळावे आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत युतीने एकत्र लढावे. आम्ही सोबत आहे आम्हाला पण योग्य जागा मिळाव्या अशी आमची मागणी आहे,' असेही रामदास आठवले यावेळी म्हणाले.

मंत्रिमंडळात आम्हला जागा मिळेल तेव्हा आम्ही नाव जाहीर करू, त्यात शंभर नाव आली आहेत त्यात प्रकाश लोंढे आहेत. विधानसभेला 10-12 जागा मिळावी अशी मागणी होती. लोकसभेत महादेव जानकर हे शरद पवारांना भेटून आले त्यांना लगेच जागा मिळाली. मी पण सर्व शरद पवारांना भेटून आललो असतो तर शिर्डीची जागा मिळाली असती, अशी कोपरखळीही आठवलेंनी लगावली.

नक्की वाचा: शरद पवारांचे मारकडवाडीत जाऊन फडणवीसांना आवाहन, नेमकं काय म्हणाले?

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com