देवा राखुंडे, पुरंदर
हिंदू खाटीकांना आणि झटका मटन दुकानदारांना मल्हार सर्टिफिकेट देण्याची घोषणा राज्याचे मंत्री नितेश राणे यांनी केली. मात्र आता या योजनेवरून नवा वाद उफाळला आहे. या योजनेला दिलेलं मल्हार नाव तात्काळ बदलण्यात यावा अशी मागणी जेजुरी देवस्थानचे विश्वस्त डॉ.राजेंद्र खेडेकर यांनी नितेश राणेंकडे केली. मात्र श्री मार्तंड देव संस्थानमध्ये यावरून दोन गट पडलेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
नितेश राणे यांनी झटका मटण दुकानांना 'मल्हार प्रमाणपत्र' देण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा वाद उफाळून आला आहे. नितेश राणे यांनी मल्हार सर्टिफिकेशन डॉट कॉम लाँच केले आहे. झटका मटण विक्री करणाऱ्या दुकानदारांना हे मल्हार प्रमाणपत्र मिळणार आहे. मात्र याच योजनेच्या मल्हार नावाला जेजुरी देवस्थानचे विश्वस्त डॉ.राजेंद्र खेडेकर यांनी कडाडून विरोध दर्शवला आहे. तर दुसरीकडे पालखी सोहळ्याचे खांदेकरी यांनी देखील मल्हार हे नाव वापरण्यावर आक्षेप नोंदवला आहे.
(नक्की वाचा- मांस विक्रेत्यांसाठीचं 'मल्हार प्रमाणपत्र' काय आहे? याच दुकानांतून मटण खरेदीचं आवाहन राणेंनी का केलं?)
आता हा निर्णय श्री मार्तंड देव संस्थानचा नाही. त्यामुळे देव संस्थानचा याच्याशी संबंध जोडू नये. नाव बदला ही भूमिका राजेंद्र खेडेकर यांची व्यक्तिगत आहे, असं म्हणत जेजुरी येथील श्री मार्तंड देव संस्थानच्या अध्यक्षांनी नितेश राणे यांच्या निर्णयाला आपलं समर्थन दर्शवलं.
( नक्की वाचा : Exclusive : 'सत्ता राजकारणासाठी महत्त्वाची, समोर गोड ताट मांडून ठेवलंय....' जयंत पाटलांची कबुली! )
कोणतेही शुभ कार्य करायचं असेल तर आपण कुलदैवताच्या नावाने करतो. त्यामुळे या नावाला श्री मार्तंड देव संस्थानचा कोणताही विरोध नसल्याचं अध्यक्ष अभिजीत देवकाते यांनी म्हटल आहे. उलट या निर्णयाचे आम्ही स्वागतच करतो आणि या नावाला श्री मार्तंड देव संस्थान चे समर्थन असल्याचं देवकाते यांनी म्हटलं आहे.