Fast Lane Driving: रोज हायवेवरून अनेक गाड्या धावतात. कुणाची गती कमी, कुणाची जास्त. पण कधी विचार केला आहे का? हायवेवर सर्वात जास्त वेग कोणत्या लेनमध्ये ठेवला जातो? अनेक लोक मानतात की जिथे जागा मिळेल तिथे वेगाने चालवा...पण सत्य यापेक्षा पूर्णपणे वेगळे आहे.चुकीच्या लेनमध्ये वेगाने गाडी चालवणे हे फक्त ट्रॅफिक नियमाचं उल्लंघन नाही,तर अपघातांचे सर्वात मोठे कारण ठरते.
हायवेवर सर्वात उजवीकडील लेनला ओव्हरटेक लेन म्हणतात. हीच ती लेन आहे जिथे सर्वात जास्त वेगाने गाडी चालवता येते, पण एका नियमासह – ओव्हरटेक करा आणि परत मधल्या लेनमध्ये या. सतत या लेनमध्ये चालणे हे फक्त चुकीचे नाही, तर धोकादायकही आहे. या लेनचा वापर फक्त त्या गाड्यांनी करावा, ज्या इतर वाहनांपेक्षा जास्त वेगाने चालत आहेत. म्हणजेच ही लेन वेगवान वाहनांसाठी आहे. पण चालकांनी वाहतुकीचे नियम पाळणे बंधनकारक आहे.
कमी वेगाने जाणाऱ्या वाहनांसाठी कोणती लेन?
जर तुम्ही सामान्य वेगात लांब अंतर पार करत असाल, तर मधली लेन तुमच्यासाठी अगदी योग्य आहे. तिला ‘बॅलन्स लेन' असेही म्हणतात, कारण ती ना खूप वेगवान आहे, ना खूप धीमी आणि अंतर पार करण्यासाठी सर्वात स्मूथ राहते. बहुतांश गाड्या याच लेनमध्ये चालतात, त्यामुळे ट्रॅफिकचा प्रवाहही सुरळीत राहतो. सर्वात डावीकडील लेन (लेफ्ट लेन) त्या वाहनांसाठी असते जी स्लो मोडमध्ये चालतात, जसे – जड ट्रक, मालवाहू गाड्या किंवा कमी वेगात जाणारी कार. या लेनमधून अचानक उजव्या लेनमध्ये जाणे अत्यंत धोकादायक आहे, कारण त्या लेनमध्ये वेगवान गाड्या असतात.
गाडी चालवताना हे नियम पाळाच
- लेन बदलण्यापूर्वी नेहमी आरसा (मिरर) पाहा.
- इंडिकेटर नक्की वापरा.
- ओव्हरटेक करून परत मधल्या लेनमध्ये या.
- स्पीड लिमिटचे प्रत्येक परिस्थितीत पालन करा.
- योग्य लेनमध्ये ड्रायव्हिंग केल्याने फक्त वेग वाढत नाही... सुरक्षितताही दुप्पट होते.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world