Dombivli News: पैशापुढे माणुसकी हरली! अपघातग्रस्ताच्या मदतीसाठी आला पण नियत फिरल्याने भयंकर घडलं

Dombivli News: मानकोली मोठा गाव ब्रिजवर अपघात झालेल्या तरुणाला हॉस्पिटलमध्ये नेण्याच्या बहाण्याने त्याच्या गळ्यातील सोन्याची चैन लुटणाऱ्या सतीश कोरे याला विष्णूनगर पोलिसांनी अटक केली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

डोंबिवलीमध्ये माणुसकीला काळिमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. अपघातात जखमी झालेल्या तरुणाला मदत करण्याच्या बहाण्याने त्याच्याच गळ्यातील सोन्याची चैन लुटणाऱ्या नराधमाला विष्णूनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

अपघातात जखमी झालेल्या एका तरुणाला रिक्षातून हॉस्पिटलला घेऊन जात असताना, सोबत असलेल्या  व्यक्तीने जखमीच्या हतबलतेचा फायदा घेत त्याला लुटले. या प्रकरणी विष्णूनगर पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीला आजदे गावातून अटक केली आहे.

अपघातानंतर मदतीचे नाटक

डोंबिवली पश्चिम येथील गोपी चौक परिसरात राहणारा तुषार शिंदे हा तरुण एक वृद्धाश्रम चालवतो. काही दिवसांपूर्वी तुषार आपल्या दुचाकीने मानकोली मोठा गाव ब्रिजवरून जात असताना त्याचा भीषण अपघात झाला. तुषार रक्ताच्या थारोळ्यात पडलेला पाहून लोक जमले. त्यावेळी सतीश कोरे नावाचा तरुण मदतीसाठी पुढे आला. त्याने माणुसकी दाखवत तुषारला रिक्षात बसवले आणि डोंबिवलीतील शास्त्रीनगर हॉस्पिटलकडे निघाला.

(नक्की वाचा-  Crime News: नाशिक हादरलं! विवाहितेचा 2 लाखांत 'सौदा'; इव्हेंटच्या नावाखाली नेलं अन् पुढे भयंकर घडलं)

रिक्षामध्येच लुटीचा बनाव

जखमी तुषार वेदनेने विव्हळत असताना रिक्षामध्ये सतीश कोरेची नियत फिरली. तुषारच्या गळ्यातील महागडी सोन्याची चैन पाहून सतीशचा लोभ सुटला. त्याने जखमी तुषारला धाक दाखवून किंवा त्याच्या हतबलतेचा फायदा घेऊन ती चैन हिसकावून घेतली. धक्कादायक म्हणजे, तुषारला हॉस्पिटलमध्ये नेऊन उपचार मिळवून देण्याऐवजी, सतीशने त्याला शास्त्रीनगर हॉस्पिटलच्या प्रवेशद्वारातच सोडून दिले आणि तिथून पळ काढला.

Advertisement

(नक्की वाचा-  Iran News: अण्वस्त्र चाचणी की भूकंप? युद्धादरम्यान इराणची जमीन हादरली; जगभरात चिंतेचं वातावरण)

विष्णूनगर पोलिसांची धडक कारवाई

हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यानंतर तुषारने घडलेला सर्व प्रकार डॉक्टरांना आणि विष्णूनगर पोलिसांना सांगितला. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधिकारी प्रशांत मोरे यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीनुसार आणि तांत्रिक तपासाच्या आधारे, पोलिसांनी डोंबिवली पूर्वेतील आजदे गावातून सतीश कोरेला अटक केली. पोलिसांनी चोरीला गेलेली सोन्याची चैन हस्तगत केली असून, सतीशने अशाच प्रकारे इतर कुणाला लुटले आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत.
 

Topics mentioned in this article