Dombivli MIDC Blast : डोंबिवली स्फोट प्रकरणात मोठी कारवाई, मुख्य आरोपीला अटक

Dombivli MIDC Blast : डोंबिवलीतील MIDC मधील रासायनिक कंपनीत झालेल्या स्फोटानंतर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.

Advertisement
Read Time: 2 mins
मुंबई:

डोंबिवलीतील MIDC मधील रासायनिक कंपनीत झालेल्या स्फोटाप्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. अमुदान पोलीस कंपनीचे मालक मलय मेहताला पोलिसांनी अटक केलीय. ठाणे स्पेशल टास्क फोर्स आणि ठाणे खंडणी पथकाचे एसीपी शेखर बागडे यांच्या पथकाने त्याला ताब्यात घेतलंय.  डोंबिवलीत गुरुवारी झालेल्या या स्फोटात आत्तापर्यंत 13 जणांचा मृत्यू झाला असून 55 जण जखमी झाले आहेत. मलय मेहताच्या आई मालती मेहताला नाशिकमधून ताब्यात घेण्यात आलंय. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

एमआयडीसीमधील रासायनिक कंपनीत स्फोट झाल्यानं डोंबिवलीकरांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला. या स्फोटाची कंपनी 2 ते 3 किलोमीटर परिसरात जाणवली. परिसरातील इमारतींच्या काचा या स्फोटात फुटल्या. त्याचबरोबर रस्त्यावरील वाहनांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. डोंबिवली एमआयडीच्या परिसरात मोठी नागरी वस्ती आहे. या प्रकरणाच्या दुर्घटनांचा डोंबिवलीमध्ये इतिहास आहे. 2016 साली देखील डोंबिवलीतील कंपन्यात याच प्रकारे स्फोट झाला होता. त्यामध्ये मोठी जीवितहानी झाली होती.  त्यामुळे या कंपन्या डोंबिवलीतून स्थलांतरित कराव्यात अशी मागणी यापूर्वी देखील करण्यात आली होती. 

( नक्की वाचा : Dombivli MIDC Blast स्फोटानं हादरलं साईबाबा मंदिर, साखरपुड्यात पळापळ, Video )
 

धोकादायक कंपन्या हटवणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी डोंबिवलीतल्या घटनास्थळी भेट देऊन मदतकार्याचा आढावा घेतला. आजूबाजूला नागरी वसाहत मोठ्या प्रमाणात आहे. यापूर्वी देखील इथं या प्रकारचा स्फोट झाला होता. अती धोकायदायक युनिट्सची यादी करण्याची सूचना आम्ही संबंधित विभागाला दिली आहे. यामधील अतिधोकादायक युनिट्स तातडीनं बंद करण्यात येतील असा निर्णय आम्ही घेतलाय. त्यांनी दुसरं प्रोडक्ट सुरु करावं अथवा शहराच्या बाहेरच्या एमआयडीसीमध्ये शिफ्ट होण्याची परवानगी आम्ही त्यांना देत आहोत. या प्रकरणाची उच्च स्तरीय चौकशी करण्यात येणार असून त्यामधील दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करुन कठोर कारवाई करण्यात येईल.' असं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं.

या घटनेत मृत्यू झालाय त्यांच्या परिवाराला मुख्यमंत्री मदतनिधीतून 5 लाख रुपये देण्यात येतील तसंच जखमींच्या उपचाराचा खर्चही करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. 
 

Advertisement