जाहिरात
Story ProgressBack

डोंबिवली स्फोटावर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया, केमिकल कंपन्याबाबत केली मोठी घोषणा

Dombivli Chemical Factory blast : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीत घटनास्थळाला भेट देऊन मदतकार्याचा आढावा घेतला.

Read Time: 3 mins
डोंबिवली स्फोटावर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया, केमिकल कंपन्याबाबत केली मोठी घोषणा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील घटनास्थळाची पाहणी केली.
डोंबिवली:

डोंबिवलीच्या MIDC मधील कंपनीत बॉयलरचा शक्तीशाली स्फोट झाला. या स्फोटात शेवटचं वृत्त हाती येईपर्यंत 8 जणांचा मृत्यू झाला असून 64 जण जखमी झाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीत घटनास्थळाला भेट देऊन मदतकार्याचा आढावा घेतला.  या स्फोटात 3 कंपन्या आणि शो रुम जळून खाक झाल्या आहेत. दुपारी 2 च्या सुमारास लागलेल्या आगीला 4 तासांच्यापेक्षा जास्त अथक परिश्रमानंतर नियंत्रण आणण्यात अग्निशमन दलाला यश मिळालंय. 


( नक्की वाचा :  Dombivli MIDC Blast स्फोटानं हादरलं साईबाबा मंदिर, साखरपुड्यात पळापळ, Video )


MIDC फेज 2 मधील कंपनीत हा स्फोट झाला. ओमेगा, अमुदान , हुंडाई सर्व्हिस सेंटर, अंबर केमिकल, सोहम इंजिनियरिंगच्या बाजूचा परिसर या स्फोटानंतर आगीच्या विळख्यात आला. या भागातील वाहनांचं देखील मोठं नुकसान झालं आहे. या कंपन्याचे प्रवेशद्वार अडचणीचे असल्यानं मदतकार्यात अडथळे येत होते. 

काय म्हणाले मुख्यमंत्री ?

डोंबिवलीमध्ये पत्रकारांशी बोलताना या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्यात येणार असून दोषींवर कठोर कारवाई करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. 

'अमुदान कंपनीत रिअक्टरचा स्फोट झाला असं प्रथमदर्शनी चौकशीत आढळून आलं आहे. हा स्फोट अतिशय तीव्रतेचा होता. आजबाजूच्या इमारतीच्या काचांनाही यामुळे तडे गेले. अद्याप मदतकार्य सुरु आहे. काही लोकं आजूबाजूच्या कंपन्यात अडकली आहेत, त्यांना बाहेर काढण्याचं काम सुरु आहे. बचावकार्याला आम्ही सर्वोच्च प्राधान्य दिलंय.

आजूबाजूला नागरी वसाहत मोठ्या प्रमाणात आहे. यापूर्वी देखील इथं या प्रकारचा स्फोट झाला होता. अती धोकायदायक युनिट्सची यादी करण्याची सूचना आम्ही संबंधित विभागाला दिली आहे. यामधील अतिधोकादायक युनिट्स तातडीनं बंद करण्यात येतील असा निर्णय आम्ही घेतलाय. त्यांनी दुसरं प्रोडक्ट सुरु करावं अथवा शहराच्या बाहेरच्या एमआयडीसीमध्ये शिफ्ट होण्याची परवानगी आम्ही त्यांना देत आहोत. या प्रकरणाची उच्च स्तरीय चौकशी करण्यात येणार असून त्यामधील दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करुन कठोर कारवाई करण्यात येईल.' असं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं.

या घटनेत मृत्यू झालाय त्यांच्या परिवाराला मुख्यमंत्री मदतनिधीतून 5 लाख रुपये देण्यात येतील तसंच जखमींच्या उपचाराचा खर्चही करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. 

डोंबिवलीतील घटनास्थळाला भेट देण्यापूर्वी काही तास आधी छत्रपती संभाजीनगरमध्ये पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी डोंबिवलीच्या स्फोटावर प्रतिक्रिया दिली. डोंबिवली एमआयडीच्या परिसरात कंपन्या आगोदर आल्या. त्यानंतर तिथं वसाहत झाली. या परिसरातील रासायनिक कंपन्या अंबरनाथमध्ये हलवण्याबाबतचा निर्णय आम्ही घेतोय, असं मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं.

( नक्की वाचा : Video : डोंबिवली MIDC मध्ये भीषण स्फोट, 8 जणांचा मृत्यू, 64 जखमी )

एमआयडीसीमधील रासायनिक कंपनीत स्फोट झाल्यानं डोंबिवलीकरांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला. या स्फोटाची कंपनी 2 ते 3 किलोमीटर परिसरात जाणवली. परिसरातील इमारतींच्या काचा या स्फोटात फुटल्या. त्याचबरोबर रस्त्यावरील वाहनांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. डोंबिवली एमआयडीच्या परिसरात मोठी नागरी वस्ती आहे. या प्रकरणाच्या दुर्घटनांचा डोंबिवलीमध्ये इतिहास आहे. 2016 साली देखील डोंबिवलीतील कंपन्यात याच प्रकारे स्फोट झाला होता. त्यामध्ये मोठी जीवितहानी झाली होती.  त्यामुळे या कंपन्या डोंबिवलीतून स्थलांतरित कराव्यात अशी मागणी यापूर्वी देखील करण्यात आली होती. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Switch To Dark/Light Mode
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination
Previous Article
पुणे पोर्शे अपघात : जामीन मिळाल्याच्या खुशीत माजोरड्या आरोपीचं रॅप साँग?
डोंबिवली स्फोटावर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया, केमिकल कंपन्याबाबत केली मोठी घोषणा
32 permit rooms bar pubs sealed in pune
Next Article
पुण्यातील 32 बार पब्ज सील, उत्पादन शुल्क विभागाची कारवाई
;