Dombivli News :आई बेपत्ता, बापाकडे पुरावा नाही; डोंबिवलीच्या 'त्या' 3 मुलांच्या अडचणी पाहून पोलिसही चक्रावले

Dombivli News : डोंबिवलीत बेवारस सापडलेल्या तीन मुलांच्या प्रकरणात एक अत्यंत धक्कादायक आणि विडंबनात्मक माहिती समोर आली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
डोंबिवली:

Dombivli News : डोंबिवलीत बेवारस सापडलेल्या तीन मुलांच्या प्रकरणात एक अत्यंत धक्कादायक आणि विडंबनात्मक माहिती समोर आली आहे. लोकांचे दाखले आणि प्रमाणपत्रे तयार करून देणाऱ्या वडिलांकडेच स्वतःची मुलं आपली असल्याचे सिद्ध करण्यासाठी कोणताही अधिकृत पुरावा नसल्याचे समोर आले आहे. 

काय आहे प्रकरण?

डोंबिवलीत काही दिवसांपूर्वी दोन मुली आणि एक मुलगा अशी तीन लहान मुले बेवारस अवस्थेत सापडली होती. विष्णू नगर पोलिसांनी या मुलांच्या वडिलांचा शोध लावला असून दीक्षांत केदारे असे त्यांचे नाव आहे. धक्कादायक बाब म्हणजे, केदारे हे खालापूर तहसील कार्यालयात खाजगी एजंट म्हणून काम करतात आणि नागरिकांना जातीचे दाखले, प्रमाणपत्रे व इतर कागदपत्रे मिळवून देण्यात मदत करतात. मात्र, इतरांचे कागदपत्रे तयार करणाऱ्या या पित्याकडे स्वतःची मुले आपलीच आहेत, हे सिद्ध करण्यासाठी एकही अधिकृत कागद उपलब्ध नाही.

Advertisement

संस्थेचा आधार आणि पोलिसांसमोर पेच

सध्या ही तिन्ही मुले सीडब्ल्यूसीच्या (CWC) मार्गदर्शनाखाली जननी आशिष या संस्थेत सुरक्षित आहेत. पोलिसांनी वडिलांचा शोध लावला असला तरी, ठोस पुराव्याअभावी मुलांना त्यांच्या ताब्यात देणे कायदेशीरदृष्ट्या कठीण झाले आहे. यामुळे पोलिसांची डोकेदुखी वाढली असून आता मुलांचे पितृत्व सिद्ध करण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.

Ulhasnagar News : जात पंचायतीचा आदेश मोडल्याने महिलांचे कापले केस, गळ्यात चपलांचा हार; उल्हासनगरमधील संतापजनक प्रकार

डीएनए चाचणीचा शेवटचा पर्याय

दीक्षांत केदारे सध्या मुलांशी असलेले नाते सिद्ध करण्यासाठी कागदपत्रांची जुळवाजुळव करत आहेत. मात्र, जर ते आवश्यक कागदपत्रे सादर करू शकले नाहीत, तर मुलांचे आणि वडिलांचे नाते सिद्ध करण्यासाठी डीएनए (DNA) चाचणी हा शेवटचा पर्याय उरतो. त्यामुळे आता केदारे कागदपत्रे देतात की त्यांची डीएनए चाचणी केली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

( नक्की वाचा :  NEET Paper Leak: बापानं लाखो खर्चून पेपर चोरला, पण पोरगा अभ्यासात ढ! नीट परीक्षेतील सर्वात मोठी 'कॉमेडी' उघड )

आईचा शोध अद्याप सुरू

या संपूर्ण प्रकरणातील आणखी एक महत्त्वाचा दुवा म्हणजे मुलांची आई कशिश केदारे. ती अद्याप बेपत्ता असून पोलीस तिचा शोध घेत आहेत. कशिश ही इंस्टाग्रामच्या माध्यमातून पती आणि इतर काही लोकांच्या संपर्कात असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली आहे. ती पोलिसांच्या हाती लागल्यानंतर या प्रकरणात अधिक स्पष्टता येण्याची शक्यता आहे.

Topics mentioned in this article