Dombivli News: डोंबिवलीत 65 बेकायदा इमारतींवर मंगळवारी तोडक कारवाई, आश्वासनाचं काय?

समर्थ अपार्टमेंट नावाच्या या इमारतीवर उद्या मंगळवारी तोडक कारवाई होणार आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
डोंबिवली:

अमजद खान 

डोंबिवलीतील 65 बेकायदा बांधकाम प्रकरणातील एका इमारतीवर उद्या मंगळवारी केडीएमसी तोडक कारवाई करणार आहे. या कारवाईच्या आधी महापालिका आणि पोलिसांनी इमारतीची पाहणी केली. या दरम्यान इमारतीमधील रहिवाशांनी प्रचंड गोंधळ घातला. आम्हाला बेघर का करता? ज्यांनी आम्हाला फसवलं त्यांच्यावर काय कारवाई करा. आमच्या घरावर कारवाई झाली तर स्वतःच्या अंगावर पेट्रोल टाकून आम्ही आत्महत्या करणार असा पवित्र रहिवाशांनी घेतला आहे. दुसरीकडे या प्रकरणात दोनदा कोर्टाचा अवमान झाला आहे. पुन्हा तिसऱ्यांदा न्यायालयाच्या अवमान झाला तर अधिकाऱ्यांवर देखील हे प्रकरण शेकणार आहे. मात्र काही दिवसापूर्वी सरकारमधील काही मंत्र्यांनी या प्रकरणात आश्वासन दिले होते की कोणाला बेघर होऊ देणार नाही, आता त्या आश्वासनाचे काय झाले? असा  संतप्त सवाल देखील नागरिकांकडून केला जात आहे.

कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात खोट्या  कागदपत्रांच्या आधारावर 65 बेकायदा इमारती बांधण्यात आल्या. या मधील काही इमारतींवर कारवाई झाली. यामध्ये बहुतांश इमारती या सरकारी जमिनीवर आहेत. इमारतीमध्ये लोक राहायला आले. लोकांनी घर घेण्यासाठी कर्ज घेतले. बँकांनी मोठ्या प्रमाणात लोन दिलं. नंतर माहित पडले की या सर्व इमारत बेकायदा आहेत. प्रकरण कोर्टात गेले. कोर्टाने या सर्व इमारतींवर कारवाईचे आदेश दिले. नागरिकांना फसवणाऱ्यांवर ठोस कारवाई करण्याचे सूचना देखील न्यायालयाने केडीएमसी आणि पोलिसांना दिल्या. 

नक्की वाचा - Kalyan News: रामदेव हॉटेलमध्ये पुन्हा निष्काळजीपणाचा कळस, फ्राईड राईसमध्ये आता आढळले...

या प्रकरणात काही मोजक्या लोकांना अटक करण्यात आली. पोलिसांनी या प्रकरणात फक्त थातूरमातूर कारवाई केली असा आरोप नागरिकांनी केला आहे. या प्रकरणी शिवसेना ठाकरे गटांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. काही दिवसापूर्वी मुंबईतील आजाद मैदानमध्ये या इमारतीतील रहिवाशांनी आंदोलन केलं. त्यावेळी मंत्र्यांकडून या प्रकरणात नागरिकांना आश्वासन देण्यात आले होते की कोणाला ही बेघर होऊ देणार नाही. या प्रकरणात जे काही शक्य होईल सरकार करणार आहे. सरकारच्या या आश्वासनानंतर लोकांनी सुटकेचा श्वास घेतला. मात्र आता या प्रकरणात कल्याण डोंबिवली महानगरपालिका प्रशासन डोंबिवलीतील अहिरे गाव परिसरातील समर्थ अपार्टमेंट नावाच्या इमारतीला नोटीस पाठवली. 

नक्की वाचा - महायुतीत वाद पेटणार! कलानी गटाची शिवसेना शिंदे गटाबरोबर युती, भाजपवर गंभीर आरोप

समर्थ अपार्टमेंट नावाच्या या इमारतीवर उद्या मंगळवारी तोडक कारवाई होणार आहे. या आधी केडीएमसीचे अधिकारी आणि पोलीस या इमारतीच्या रहिवाशांना भेटायला गेले. त्या ठिकाणी पाहणी केली. यावेळी इमारतीतील नागरिक संतप्त झाले. आम्ही कर्ज घेऊन घर घेतली.  गरीब लोक आहोत. आम्हाला बेघर का करता? आम्हाला ज्यांनी फसवलं त्यांचा काय झालं त्यांच्यावर काय कारवाई केली असा संतप्त सवाल केला आहे. तर एका महिलेने थेट आम्ही आत्मदहन करणार असल्याच्या सांगितले आहे. समर्थ अपार्टमेंट मधील नागरिकांच्या भवितव्याच्या निर्णय उद्या होणार आहे. या प्रकरणी केडीएमसी प्रशासनाच्या म्हणणे आहे की 65 बेकायदा बांधकाम प्रकरणात दोनदा न्यायालयाच्या अवमान झाला आहे. तिसऱ्यांदा अवमान झाला तर अधिकाऱ्यांवर कारवाई होणार आहे. केडीएमसी प्रशासन कारवाई करण्यावर ठाम आहेत. आता सरकार या प्रकरणात हस्तक्षेप करणार का हे  पहाणे महत्त्वाच्या ठरणार आहे.

Advertisement