
अमजद खान
रामदेव हॉटेल हे कल्याणमधील एक प्रसिद्ध हॉटेल म्हणून ओळखले जाते. कल्याणकर या हॉटेलमध्ये हमखास जेवणासाठी जात असतात. या हॉटेलचे उत्तम जेवण हीच या हॉटेलची ओळख आहे. पण आता ही ओळख पुसत चालली आहे. त्याला कारण ही तसेच आहे. या हॉटेलमध्ये गेल्या काही दिवसापासून जेवणाच्या पदार्थात नको त्या गोष्टी आढळून आल्या आहेत. त्यामुळे ग्राहकांनी तिव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. काही दिवसां पूर्वी या हॉटेलमध्ये जेवणात लोखंडाचा तुकडा आढळला होता. हा प्रकार ताजा असताना आता आणखी एक धक्कादायक प्रकार हॉटेलमध्ये घडला आहे. त्यामुळे ग्राहकांनी संताप व्यक्त करत कठोर कारवाईची मागणी केली आहे.
कल्याण शहरातील प्रसिद्ध रामदेव हॉटेल पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. काही दिवसांपूर्वी एका ग्राहकाच्या जेवणामध्ये लोखंडाचा तुकडा आढळल्याची घटना ताजी असतानाच, आता पुन्हा एकदा फ्राईड राईसमध्ये झुरळ आढळल्याने ग्राहकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. मुंबई महापालिकेत उच्चपदावर कार्यरत असलेल्या निकिता जाधव या कल्याणच्या रामदेव हॉटेलमध्ये पार्सल घ्यायला गेल्या होत्या. नेहमी प्रमाणे त्यांनी ऑर्डर दिली. त्यांना पार्सलही देण्यात आले. त्यांनी फ्राईड राईस ऑर्डर केली होती. त्यांना त्यांचे पार्सल देण्यात आले.
नक्की वाचा - महायुतीत वाद पेटणार! कलानी गटाची शिवसेना शिंदे गटाबरोबर युती, भाजपवर गंभीर आरोप
पार्सल घेऊन निकिता या घरी गेल्या. घरी त्यांची मुलीने ते पार्सल घेतले. फ्राईड राईस घेवून ती जेवणासाठी बसली. त्यावेळी फ्राईड राईसमध्ये तिला झुरळ आढळले. धक्कादायक बाब म्हणजे तो फ्राईड राईस त्यांच्या मुलांनी खाल्ला आहे. मुलांना काही झाले झाले तर याला जबाबदार कोण असा सवाल निकीता यांनी उपस्थित केला आहे. या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात येणार आल्याची माहिती निकीता जाधव यांनी दिली आहे.
नक्की वाचा - Mamata banerjee: ठाकरेंच्या पावलावर ममता बॅनर्जींचे पाऊल! बंगालमध्ये घेतला मोठा निर्णय
सलग घडणाऱ्या घटनांमुळे रामदेव हॉटेलच्या स्वच्छता व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मोठ्या विश्वासाने लोक इथं जेवणासाठी जातात. पण त्यांच्या पदरी निराशा पडत आहे. त्यामुळे ग्राहकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. त्यात हॉटेल रामदेवच्या व्यवस्थापकांना याबाबत विचारण्यात आले. त्यावर थांबा आम्ही नंतर बोलू असं उत्तर दिलं जात आहे. शिवाय काही तरी आम्ही नक्की करू अशी उडवा उडवीची उत्तर दिली जात आहेत. त्यामुळे हॉटेलचे व्यवस्थापन याची जबाबदारी घेणार आहे की नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world