अमजद खान, कल्याण
डोंबिवलीतील 65 अनधिकृत इमारतींच्या प्रकरणावरुन आता राजकारण देखील रंगू लागलं आहे. अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांना, नागरिकांची फसवणूक करणाऱ्यांना ठाण्यातून अभय आहे, अशी टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी आमदार राजू पाटील यांनी शिंदे पिता-पूत्रांवर केली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
राजू पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करताना म्हटलं की, "सेलिब्रिटींच्या घरी जायला वेळ आहे. मात्र 65 इमारती मधील रहिवाशांना भेटायला वेळ नाही. इथले पालकमंत्री आहात, नगरविकास मंत्री आहात, तुमचा मुलगा इथला खासदार आहे. गंगेत डुबकी मारून पुण्य मिळवण्यापेक्षा या राहिवाशांना येऊन भेटा जास्त पुण्य मिळेल."
(नक्की वाचा- Exclusive : 18 कोटींचं कर्ज माफ केलं 'ती' बॉलिवूड अभिनेत्री कोण? 'न्यू इंडिया' बँकेचा आणखी एक प्रताप)
"विधानसभा निवडणुकीत संबंधित बिल्डरला इमारत तोडण्याची धमकी देत काम करायला लावले. ही साखळी जोपर्यंत तोडत नाही तोपर्यंत इथे काही होणार नाही. यांचा आका ठाण्यात बसला आहे. गँग ऑफ डोंबिवलीचा म्होरक्या ठाण्यात आहे", अशी राजू पाटलांनी केली.
( नक्की वाचा : Dombivli '65 बेकायदा इमारतीमध्ये घोटाळा करणाऱ्याला पोलिसांचे संरक्षण', थेट आयुक्तांसमोरच गंभीर आरोप )
"रहिवाशांच्या पाठीशी मनसे उभी आहे. त्यांना कायदेशीर सल्ला देण्यासाठी लागणारी आर्थिक मदत करू यांना दिलासा कसा देता येईल, यासाठी मंत्री गणेश नाईक यांना भेटणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून न्यायाची अपेक्षा आहे", असं देखील राजू पाटील यांनी म्हटलं.