Dombivli News : डोंबिवलीतील सोसायट्यांमध्ये दुचाकीस्वार 'बंटी-बबली'चं विचित्र कृत्य; गेटसमोर येऊन भलतीच चोरी

डोंबिवली एमआयडीसी निवासी परिसरात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

जाहिरात
Read Time: 1 min

Dombivli News : डोंबिवली एमआयडीसी निवासी परिसरात कचऱ्याचे मोठे डबे चोरीला जाण्याच्या घटना वाढत असल्याचं समोर आलं आहे. मोठ्या सोसायट्या आणि इमारतींमधून ओला-सुका कचरा वेगळा करण्यासाठी चाक असलेले विशेष डबे ठेवण्यात आले आहेत. मात्र हेच डबे आता चोरट्यांच्या निशाण्यावर आले आहेत. एक डबा चोरी करताना दोघेजळ सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले आहेत. 

पालिकेच्या कचऱ्याच्या डब्यांवर चोरांची नजर...

या कचरा डब्यांची बाजारातील किंमत अंदाजे तीन हजार रुपयांच्या आसपास असल्याचे सांगितले जात आहे. घंटागाडी आल्यानंतर कमी वेळेत आणि सहज कचरा टाकता यावा यासाठी हे डबे वापरले जातात. मात्र काही जण हे डबे चोरी करून भंगारात किंवा सेकंडहॅण्ड स्वरूपात विकत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

Advertisement

नक्की वाचा - Badlapur News : बदलापूर उड्डाणपुलावर मनसे पदाधिकाऱ्याला चिरडलं; विरुद्ध दिशेने दुचाकी चालवताना भयंकर घडलं

मंगळवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास डोंबिवली एमआयडीसी निवासी भागातील सिमेन्स सोसायटीसमोर ठेवलेले कचऱ्याचे डबे दुचाकीवरून आलेल्या एका जोडप्याने चोरी केल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात येणार असून, संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी रहिवाशांनी केली आहे. परिसरातील वाढत्या चोरीच्या घटनांवर पोलिसांनी लक्ष द्यावे अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

Topics mentioned in this article