जाहिरात

Badlapur News : बदलापूर उड्डाणपुलावर मनसे पदाधिकाऱ्याला चिरडलं; विरुद्ध दिशेने दुचाकी चालवताना भयंकर घडलं

बदलापूर पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या उड्डाणपुलावर एक धक्कादायक अपघात घडला आहे.

Badlapur News : बदलापूर उड्डाणपुलावर मनसे पदाधिकाऱ्याला चिरडलं; विरुद्ध दिशेने दुचाकी चालवताना भयंकर घडलं

Badlapur News : बदलापूर पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या उड्डाणपुलावर एक धक्कादायक अपघात घडला आहे. समोरून आलेल्या कारने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी राजेश शेटे हे गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातानंतर बदलापूर पूर्व-पश्चिमेला जोडणाऱ्या उड्डाणपुलावरील विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीस्वारांवर नियंत्रण आणण्याबाबत कडक नियमावली आखण्याची मागणी केली जात आहे. 

बदलापुराच्या उड्डाणपुलावर नेमकं काय घडलं? 

सोमवारी, ८ जूनच्या रात्री मनसे पदाधिकारी राजेश शेटे रात्री काम संपवून बदलापूर पश्चिमेकडून बदलापूर पूर्वेकडे जात होते. उड्डाणपुलावर समोरून आलेल्या कारने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात ते गंभीर जखमी झाले असून घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. अपघातानंतर कारचालक काही वेळ घटनास्थळी थांबला होता. मात्र त्यानंतर तो कारसह फरार झाला. या प्रकरणी बदलापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपी कारचालकाचा शोध सुरू आहे. 

नक्की वाचा - Mumbai Metro : मुंबई मेट्रो-14 चा गेम चेंजर प्लान, खाडीच्या खालून धावणार मेट्रो; बदलापुरकरांची 'बल्ले बल्ले'!

बदलापूर उड्डाणपुलावर दुचाकी स्वारांचा विरुद्ध दिशेने प्रवास...

दरम्यान, या उड्डाणपुलावर विरुद्ध दिशेने वाहन चालवण्याचे प्रकार गेल्या काही महिन्यांपासून वाढले आहेत. त्यामुळे वारंवार अपघात होत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. यासाठी डिव्हायडरही वाढविण्यात आला आहे. मात्र तरीही दुचाकी आणि रिक्षाचालक सर्रास विरुद्ध दिशेने येतात आणि स्वत:सह प्रवाशांचाही जीव धोक्यात टाकत आहे. अनेकदा विरुद्ध दिशेने केलेल्या प्रवाशामुळे उड्डाणपुलावर वाहतूक कोंडीची समस्याही उद्भवते. दरम्यान बदलापूर पोलिसांकडून यापूर्वीही जनजागृती आणि दंडात्मक कारवाई करण्यात आली. मात्र तरीही अनेक वाहनचालक नियमांकडे दुर्लक्ष करत जीव धोक्यात घालत असल्याचं दिसून येत आहे. सध्या या अपघाताचा पुढील तपास बदलापूर पोलीस करत आहेत.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com