जाहिरात

Dombivli video: मुलाने खोबरं खाल्लं, म्हणून आईलाच मारलं, बायकांसोबत पुरूषांची ही अमानुष मारहाण

अतिशय शुल्लक कारणावरून इतका टोकाचा वाद झाला. त्यात खोबरं खाण्यासाठी गेलेला मुलगा हा गतीमंद आहे.

Dombivli video: मुलाने खोबरं खाल्लं, म्हणून आईलाच मारलं, बायकांसोबत पुरूषांची ही अमानुष मारहाण
  • डोंबिवलीतील पिसवली गावात एका ८ वर्षांच्या गतीमंद मुलाने रस्त्यावर ठेवलेले खोबरे उचलल्यावर वाद झाला होता
  • वादाच्या दरम्यान त्या मुलाच्या आईला अनेक महिलांनी आणि एका पुरुषाने जोरदार मारहाण केली
  • मारहाण करण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून लोकांनी या घटनेवर तीव्र संताप व्यक्त केला आहे
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.
डोंबिवली:

अमजद खान 

डोंबिवलीत नक्की चाललंय तरी काय अशी म्हणण्याची वेळ आली आहे. अशीच एक धक्कादायक  घटना समोर आली आहे. एका 8 वर्षाच्या लहान मुलाने रस्त्यावर सुकण्यासाठी ठेवलेले खोबरे उचलले. त्यामुळे त्या  मुलाच्या आईला मारहाण करण्यात आली. मारहाण करणाऱ्यांमध्ये महिला आघाडीवर होत्या. पण सर्वात धक्कादायक बाब म्हणजे त्यात एका पुरूषाने ही या महिलेच्या अंगावर हात टाकला. व्हिडीओमध्ये ते स्पष्ट पणे दिसत आहे. याबाबत फक्त अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या मारहाणीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. शिवाय लोकं संताप ही व्यक्त करत आहे. ज्या मुलाने खोबरे उचलले होते तो मुलगा गतीमंद असल्याचं ही समोर आलं आहे.  

पिसवली गावातील एका चाळीमध्ये राहणाऱ्या दोन कुटुंबात किरकोळ करणावरून वाद झाला. एका लहान मुलाने वाळत टाकलेले खोबरे खाण्यासाठी उचलले होते. हे निमित्त झाले. ते पाहून तिथे असलेल्या काहा महिलांनी त्या मुलाच्या आईला जोरदार मारहाण करण्यास सुरूवात केली. त्यात एका पुरूषाने ही त्या मुलाच्या आईला मारहाण केली. एकच वेळी अनेक जण त्या महिलेवर तुटून पडले. हे सर्व घडत असताना तिथे असलेल्या एकाने याचा व्हिडीओ केला. तोच व्हिडीओ आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. 

नक्की वाचा - Trending News:10 लाखांची नोकरी सोडून जर्मनी गाठले!, भारतीय तरुणीने असं पाऊल का उचलले? कारण ऐकून हैराण व्हाल

या व्हिडीओमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी सुरू असल्याचे दिसत आहे. काही लोक या दोघींचा वाद सोडवण्याचे प्रयत्न करीत आहेत. तर काही जण एका महिलेला मारहाण करीत आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर चर्चेचा विषय ठरला. या प्रकरणात डोंबिवलीतील मानपाडा पोलीस ठाण्यात अदखलपात्र तक्रार दाखल आहे. परंतु जेव्हा व्हिडिओ कुठला आहे आणि कधीच आहे याची माहिती घेतली असता  अतिशय धक्कादायक माहिती समोर आली. हा व्हिडिओ शनिवारी संध्याकाळचा आहे. डोंबिवलीतील पिसवली गावात दोन शेजारी महिलांमध्ये हा वाद झाला होता. 

नक्की वाचा - Trending News: 5 दिवसात 4 राज्य फिरला, ब्रिटीश युट्यूबर भारताबाबत थेट बोलला, म्हणाला खरा चेहरा...

अतिशय शुल्लक कारणावरून इतका टोकाचा वाद झाला. त्यात खोबरं खाण्यासाठी गेलेला मुलगा हा गतीमंद आहे. याचा ही मारहाण करणाऱ्यांना काही फरक पडला नाही. महिला तर त्याच्या आईला मारतच होत्या. पण एक पुरुषी ही त्या महिलेला मारहाण करत होता. त्या व्हिडीओत ते स्पष्ट पणे दिसत आहे. असं असताना पोलीसांनी कमाल केली. ऐवढा मोठा प्रकार घडला असताना ही फक्त अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करत बोळवण केली. अशा वेळी त्या महिलेने न्यायासाठी जायचे कुणाकडे असा प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रकरणी सोशल माडियावर तिव्र प्रतिक्रीया उमटत आहे. शिवाय पोलीसांच्या कार्यपद्धती बाबत ही नाराजी व्यक्त केली जात आहे.  

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com