Dombivli News: विधानसभा निवडणुकीचा राग आता राडा, डोंबिवलीत चाललंय काय?

याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही गटाच्या तक्रारीवरून परस्परविरोधी गुन्हा दाखल केला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
डोंबिवली:

अमजद खान 

डोंबिवलीत सध्या राजकीय वातावरण तापल्याचे दिसून येत आहे. इथं दोन गटांमध्ये जोरदार राडा झाला आहे. या मागचे कारण हे विधानसभा निवडणुका हे आहे. वाद विधानसभा निवडणुकीत झाला होता पण त्याचे पडसाद मात्र आता उमटले आहेत. माजी नगरसेवक विकास म्हात्रे आणि मेघराज तुपांगे यांच्या समर्थकांमध्ये हा राडा झाल्याची माहित आहे. या राड्यात पाच जण जखमी आहेत. या प्रकरणी विष्णू नगर पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. दोन्ही गटांनी एकमेकांवर गंभीर आरोप केले आहेत. विष्णूनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केले आहेत. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

डोंबिवली पश्चिमेतील राजुनगर खंडोबा मंदिर जवळ व्यावसायिक मिलिंद देशमुख यांचे ऑफस आहे. या ठिकाणी  विकास म्हात्रे काही कामानिमित्त शनिवारी रात्री गेले होते. याचवेळी मेघराज तुपांगे देखील त्याठिकाणी आले. मेघराज तुपांगे यांचा म्हात्रे यांच्या पोलिस अंगरक्षकासोबत वाद झाला. मेघराज तुपांगे यांनी आरोप केला की, त्याठिकाणी आपल्याला धमकी देण्यात आली. मी कार्यालयाबाहेर पडलो त्यादरम्यान विकास म्हात्रे यांच्या सांगण्यावरून माझ्यावर आणि माझा मित्रावर प्राणघातक हल्ला करण्यात आला असं तुपांगे यांनी सांगितलं. तलवार,रॉड आणि लाकडी दांडके घेऊन दहा ते पंधरा जणांनी आपल्यावर आणि मित्रांवर प्राणघातक हल्ला केला असं ही ते यावेळी म्हणाले. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - Rahul Gandhi: 'त्यावेळी मी नव्हतो, पण...', शिख दंगलीबाबत राहुल गांधींचे मोठं वक्तव्य

शिवाय आपली सोन्याची चैनदेखील चोरण्यात आली. निवडणुकीचा राग माझ्यावर काढण्यात आला. माझी काही चुकी नसताना हा हल्ला केला आहे. त्यांच्यामुळे माझ्या जीविताला धोका आहे. माझ्यावर अन्याय झाला आहे पोलिसांकडून मला न्याय मिळेल अशी मला आशा असल्याचे तुपांगे यांनी सांगितले.याबाबत विकास म्हात्रे म्हणाले की, देशमुख यांच्या कार्यालयात गेलो होतो त्यावेळी माझ्या पोलिस अंगरक्षकाला तुपांगे यांनी शिवीगाळ केली. त्यानंतर, अंगरक्षकासोबत स्थानिक पोलीस ठाण्यात जावून तक्रार दाखल केली. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - Pahalgam attack:'...तर भारतावर अणूबॉम्ब टाकू', पाकिस्तानच्या 'या' बड्या अधिकाऱ्याने दिली धमकी

अर्ध्या तासानंतर तुपांगे यांनी त्यांच्या समर्थकासह आमच्या कार्यकर्त्यांवर हल्ला केला. याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही गटाच्या तक्रारीवरून परस्परविरोधी गुन्हा दाखल केला आहे. मेघराज तुपांगे यांच्या तक्रारीवरून ओमकार म्हात्रे, प्रमोद चव्हाण, महेश चव्हाण, अजय गोलतकर आणि अखिल निंबाळकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यात मेघराज तुपांगे, विशाल म्हात्रे आणि शत्रुघ्न मढवी हे तिघे जखमी आहेत. तर, अजय गोलतकर यांच्या तक्रारीवरून मेघराज तुपांगे, उमेश भोईर, शत्रुघ्न मढवी, विशाल म्हात्रे, अशोक म्हात्रे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Advertisement