Dombivli Building Slab Collapsed News : डोंबिवलीत चार मजली धोकादायक इमारतीच्या गॅलरीचा काही भाग अचानक कोसळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.या इमारतीत राहणाऱ्या सात कुटुंबांना केडीएमसी प्रशासनाने तातडीने सुरक्षित बाहेर काढले असून पुढील कारवाई लवकरच सुरू होईल. यासाठी प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे.
पावसाळ्यापूर्वी केडीएमसीने धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतींचे सर्वेक्षण करून वर्गीकरण केले होते.शहरात सुमारे 650 धोकादायक इमारती असून त्यापैकी 225 इमारती अतिधोकादायक असल्याची नोंद आहे.या सर्व इमारतींना यापूर्वी नोटिसा बजावण्यात आल्या होत्या.तसेच रहिवाशांनी तातडीने इमारती रिकाम्या कराव्यात,अशा सूचनाही महापालिकेकडून देण्यात आल्या होत्या.
नक्की वाचा >> Pune News: पु्ण्यातील हिंजेवाडीत हिट अँड रन, दोन्ही गाड्यांचा थरारक व्हिडीओ आला समोर, नागरिकांमध्ये संताप
परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले अन्..
दरम्यान,गुरुवारी सायंकाळी डोंबिवली पश्चिमेतील जुना डोंबिवली परिसरातील तुकाराम नगर निवास या चार मजली इमारतीच्या गॅलरीचा काही भाग अचानक कोसळला.घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.माहिती मिळताच केडीएमसीचे अधिकारी आणि भाजप नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी घटनास्थळी धाव घेतली.
नक्की वाचा >> Thane News: ठाण्यातील 'या' भागात काळजाचा थरकाप उडवणारी घटना, घरातून बाहेर पडताच 17 वर्षीय मुलीचा मृत्यू
नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी सांगितले की,धोकादायक इमारतींबाबत नागरिकांमध्ये सातत्याने जनजागृती केली जात आहे.कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी महापालिकेच्या अधिकाऱ्यांनाही आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या असून धोकादायक इमारतीतील रहिवाशांनी तातडीने सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे,असे आवाहन करण्यात आले आहेत.