सूरज कसबे, प्रतिनिधी
Pune Hit And Run Video : पुण्यातील हिंजवाडीत हिट अँड रनची धक्कादायक घडना उघडकीस आली आहे.आय टी पार्क हिंजवडी परिसरात आज सकाळी हिट अँड रनची ही घटना घडली.मारुंजी लिंक रोड ते विप्रो सर्कल दरम्यान ही घटना घडली असून एक व्हिडीओ समोर आला आहे. या घटनेचा व्हिडीओ समोर आल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,एक दुचाकीस्वार आणि पांढऱ्या रंगाच्य कारचा चालक रस्त्यावर जात असताना त्यांच्यात अचानक वाद झाला.त्यानंतर दुचाकीस्वाराने कारचालकाचा पाठलाग करण्यास सुरुवात केली.पाठलाग करत असताना दुचाकीस्वाराने कारमध्ये बसलेल्या एका व्यक्तीला हाताने मारहाण करण्याचा प्रयत्न केला.
नक्की वाचा >> Thane News: ठाण्यातील 'या' भागात काळजाचा थरकाप उडवणारी घटना, घरातून बाहेर पडताच 17 वर्षीय मुलीचा मृत्यू
दुचाकीस्वार थेट एका उभ्या कारवर आदळला आणि..
त्यानंतर विप्रो सर्कलजवळ कारने दुचाकीला जोरदार धडक दिली,ज्यामुळे दुचाकीस्वार थेट एका उभ्या कारवर आदळला आणि त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.धडक दिल्यानंतर कारचालक घटनास्थळावरून कॅपजेमिनीच्या दिशेने भरधाव वेगाने पसार झाला.
नक्की वाचा >> Amravati News : चार्जिंगला लावलेली 'शिवाई' इलेक्ट्रिक बस चोरणारा सापडला, आतापर्यंत चोरल्या होत्या तब्बल 20 बस
या घटनेत दोन्ही बाजूंची चूक असल्याचे समोर आलं आहे. दरम्यान, घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला असून या गंभीर प्रकरणाचा तपास लवकरात लवकर करावा,अशी मागणी नागरिकांनी केली जात आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world