जाहिरात

Thane News: ठाण्यातील 'या' भागात काळजाचा थरकाप उडवणारी घटना, घरातून बाहेर पडताच 17 वर्षीय मुलीचा मृत्यू

मागील दोन दिवसांपासून राज्यभरात पावसाने धुमाकूळ घातला आहे. मुंबईसह अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाच्या जोरदार सरी बरसत आहेत.ठाणे जिल्ह्यातील मुंब्र्याच्या यास्मिन पार्कमध्ये असलेल्या कादर पॅलेसमध्ये एक दुर्देवी घटना घडली.

Thane News: ठाण्यातील 'या' भागात काळजाचा थरकाप उडवणारी घटना, घरातून बाहेर पडताच 17 वर्षीय मुलीचा मृत्यू
Girl Dies In Thane Mumbra

Thane Rain Incident News : मागील दोन दिवसांपासून राज्यभरात पावसाने धुमाकूळ घातला आहे. मुंबईसह अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाच्या जोरदार सरी बरसत आहेत.ठाणे जिल्ह्यातील मुंब्र्याच्या यास्मिन पार्कमध्ये असलेल्या कादर पॅलेसमध्ये एक दुर्देवी घटना घडली.येथे मोठ्या प्रमाणात पाणी तुंबलं होतं. यादरम्यान, वीजेचा शॉक लागून 17 वर्षीय आलिया चांदीवाला या मुलीचा मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार,इमारतीच्या B विंगमध्ये राहणारी आलिया काहीतरी कामासाठी घरातून बाहेर निघाली होती.परंतु, त्यावेळी पाण्यात विद्युत प्रवाह सुरू होता.आलियाने पाण्यात पाय टाकताच तिला वीजेचा जोरदार धक्का बसला. त्यानंतर तिला तातडीनं जवळच्या रुग्णालयात नेण्यात आलं.त्यावेळी डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं.

आलियाचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला

घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन आणि स्थानिक नगरसेवक शोएब डोंगरे घटनास्थळी पोहोचले आणि पंचनामा केला. पोलिसांनी आलियाचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे. दरम्यान, याप्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. 

नक्की वाचा >>  Amravati News : चार्जिंगला लावलेली 'शिवाई' इलेक्ट्रिक बस चोरणारा सापडला, आतापर्यंत चोरल्या होत्या तब्बल 20 बस

मुंबईत पडली 113 झाडे, 31 जिल्ह्यांसाठी अलर्ट

न्यूज एजन्सी आयएएनएसच्या माहितीनुसार,मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात पावसाच्या सरी कोसळल्या आहेत. हवामान विभागाने आज गुरुवारी राज्यातील 31 जिल्ह्यांना अलर्ट जारी केला आहे.या भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

नक्की वाचा >> Pune News: पुण्याच्या इंदापूर नगर परिषदेच्या विरोधी पक्षनेत्यावर जीवघेणा हल्ला, भरदिवसा चाकूने केले वार

संपूर्ण बातमी वाचा
Listen to the latest songs, only on JioSaavn.com