Nashik News: 'मुस्लिमांना नवरात्र उत्सवात घेऊ नका', 'या' कट्टर नेत्याच्या वक्तव्याने वाद पेटणार

दरम्यान जे दुर्गादेवीच्या मूर्तिपूजेला मानत नाहीत त्यांनी गरब्याला का यावे? असं ते म्हणाले.

जाहिरात
Read Time: 2 mins
नाशिक:

नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे संस्थापक अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांचे नाशिकमध्ये वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यांनी मुसलमानांना नवरात्र उत्सवात येऊ देऊ नका. नाहीतर दंगल झाल्यास प्रशासनाची जबाबदारी राहील असा थेट इशाराच दिला आहे. त्यांच्या या वक्तव्याने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.  उद्या सोमवारपासून नवरात्राला सुरूवात होत आहे. या उत्सवात मुस्लीमांना प्रवेश देवू नका. प्रत्येक व्यक्तीला तपासा असा सल्लाही त्यांनी हिंदूत्ववादी संघटनाना दिला आहे. ते नाशिकमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते. 

यावेळी बोलताना ते म्हणाले.  मी नाशिक आलो आहे. मी सर्वांशी चर्चा करणार आहे. नवरात्रात नऊ दिवस दुर्गा देवीचे पूजन केले जाणार आहे. या उत्सवात मुस्लिमाना येऊ देवू नका. त्यांना नवरात्रात का येऊ द्यायचे असा प्रश्न त्यांनी केला. शिवाय मी हिंदुना सांगतो सर्वांना प्रत्येकाची आधार कार्ड बघून प्रवेश द्या. सरकार पण काळजी घेईल ही व्यवस्था करा. जर या काळात दंगल झाली तर सरकारची जबाबदारी असेल अशी धमकी वजा इशारा ही त्यांनी दिला आहे. 

नक्की वाचा - Navratri 2025: नवरात्रात घरात 'या' गोष्टी आणल्याने वाढते सुख-समृद्धी, मिळतो देवी भगवतीचा आशीर्वाद

ते पुढे म्हणाले की मी इशारा देत नाही, वेळे प्रसंगी रस्तावर उतरेन असे ही ते म्हणाले. हिंदू हिंदूच आहे.  हा देश हिंदू धर्माच्या बापाचा आहे.  कोणत्याही पक्षाचे पदाधिकारी माझ्या सोबत नसता, ते मला येऊन भेटू शकता असं ही ते म्हणाले. दरम्यान जे दुर्गादेवीच्या मूर्तिपूजेला मानत नाहीत त्यांनी गरब्याला का यावे?  मुसलमानांनी पण जिद्द करू नये. सरकारने हिंदूंना मजबूर करू नये. नवरात्राशी मुसलमानांचा काहीही संबंध नाही असे ही ते म्हणाले. हिंदूंनी कोणाला येऊ देऊ नये, सगळ्याचे ओळखपत्र चेक करावे असं ही ते म्हणाले. 

नक्की वाचा - Mhada News: म्हाडाची घरं आणखी स्वस्त होणार, नव्या किंमत ऐकून तुम्ही ही व्हाल आवाक

आम्ही मशिदीमध्ये जायची जिद्द करतो का असं ही तोगडिया म्हणाले. त्यांना आमच्या सणामध्ये का यायचे आहे ? हिंदुस्थान अरबस्तान झालाय का ? असं म्हणत सरकारने काळजी घ्यावी, मुसलमानांना येऊ देऊ नये, नाहीतर दंगल झाल्यास प्रशासनाची जबाबदारी राहील असा इशाराच त्यांनी दिला. त्यांच्या या वक्तव्यामुळे वाद होण्याची दाट शक्यता आहे. शिवाय नवरात्र सुरू होण्याच्या आधीच असं वक्तव्य केल्याने त्याला वेगळे वळण मिळण्याचीही शक्यता नाकारचा येत नाही. 

Advertisement