निवडणुकीत कुणबी मराठा उमेदवाराला मतदान करू नका, प्रकाश आंबेडकरांचं खळबळजनक वक्तव्य

Prakash Ambedkar : इथला कुणबी मराठा डबल भूमिका घेतो.  आपल्यामध्ये बसला की स्वतःला ओबीसी म्हणवतो आणि पाटलांमध्ये बसला की मराठा म्हणतो.

Advertisement
Read Time: 2 mins

साजन ढाबे, वाशिम

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या वक्तव्याने वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. निवडणुकीत कुणबी मराठा उमेदवाराला मतदान करू नका, असं आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी ओबीसींना केलं आहे. विधानसभेत ठरावाच्या वेळी कुणबी समाजातील पाटील जागा झाला तर ते आपल्या बाजूने मतदान करणार नाहीत. त्यामुळे यापुढे ओबीसींनी कुणबी सोडून इतर ओबीसी उमेदवाराला मतदान केलं पाहिजे, असं वक्तव्य आरक्षण बचाव यात्रेनिमित्त पोहरादेवी येथे आलेल्या प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.

प्रकाश आंबेडकर नेमकं काय म्हणाले?

विधानसभा निवडणुकीत खूनगाठ बांधा मी ओबीसीलाच मतदान करेन, त्यामध्ये  कुणबी मराठ्याला मतदान करणार नाही. कारण इथला कुणबी मराठा डबल भूमिका घेतो.  आपल्यामध्ये बसला की स्वतःला ओबीसी म्हणवतो आणि पाटलांमध्ये बसला की मराठा म्हणतो. विधानसभेत ठरावाच्या वेळी त्याच्यातली पाटीलकी जागृत झाली मग काय राहील आपलं? असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला. तो आपल्या बाजूने मतदान करण्याऐवजी त्यांच्या बाजूने मतदान करेल. ओबीसींमधील इतर जातीच्या उमेदवारालाच मतदान केलं पाहिजे, असंही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं.

विधानसभेत ओबीसींचे 100 आमदार गेले पाहिजेत

हिंगोलीमध्ये बंजारा समाजाची तीन लाख मतदान आहे. मात्र वंचितच्या उमेदवाराला 30 हजारांच्या वर बंजारा समाजाचे मतदान झालं नाही. शिवसेना, भाजप बंजारा समाजाला उमेदवारी देणार नाही. सध्याच्या विधानसभेत ओबीसींचे फक्त 11 आमदार आहेत. येणाऱ्या विधानसभेत व्हीजेएनटी आणि ओबीसीच आरक्षण जाणार कारण भाजप, शिवसेना आणि काँग्रेस उमेदवारी देणार नाही. सध्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ओबीसीला आरक्षण नाही. त्यामुळे येणाऱ्या विधानसभेत ओबीसींचे 100 उमेदवार गेले पाहिजेत, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं. 

Advertisement
Topics mentioned in this article