उल्हासनगर महापालिकेत 'डमी' कर्मचारी; सरकारी कर्मचारी वैयक्तिक कामात व्यस्त

महापालिकेतील काही कर्मचारी आपल्या कामाच्या वेळेत हजर राहून नंतर वैयक्तिक कामासाठी बाहेर पडतात. असे कर्मचारी महापालिकेतून पगार घेत असून खाजगीतही कमाई करत आहेत.

Advertisement
Read Time: 1 min

निनाद करमरकर, उल्हासनगर

उल्हासनगर महापालिकेतून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उल्हासनगर महापालिकेत डमी कर्मचारी कार्यरत असल्याचं समोर आलं आहे. कार्यरत असलेले काही कर्मचारी आपल्या ड्युटीवर जात नसून इतर कर्मचारी त्यांच्या जागेवर कामावर येत असल्याचं उघड झालं आहे. मूळ कर्मचारी केवळ हजेरीपुरतेच हजर आहेत. याप्रकरणी नुकतीच महापालिका प्रशासनाने 3 कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीसही बजावली आहे. 

'NDTV मराठी'चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

उल्हासनगर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर आणि उपायुक्त सुभाष जाधव यांनी नुकतीच सफाई कर्मचाऱ्यांच्या हजेरी शेडची पाहणी केली. त्यावेळी काही कर्मचारी घटनास्थळी उपस्थित नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यानंतर महापालिका प्रशासनाने स्वच्छता निरीक्षक आणि मुकादम या पदावर कार्यरत कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. 

( नक्की वाचा : Maharashtra Budget 2024 : दुधाचे दर कमी होणार? अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी खास सवलती )

महापालिकेतील काही कर्मचारी आपल्या कामाच्या वेळेत हजर राहून नंतर वैयक्तिक कामासाठी बाहेर पडतात. असे कर्मचारी महापालिकेतून पगार घेत असून खाजगीतही कमाई करत आहेत. अशा कर्मचाऱ्यांवर उल्हासनगर महापालिका कडक कारवाई करण्याचे उपायुक्त डॉ. सुभाष जाधव यांनी म्हटले आहे.

Topics mentioned in this article