जाहिरात

Ashok Kharat: अशोक खरातची कोठडीत चांगलीच जिरली! लोकांसमोर यायलाही घाबरतोय, पत्नीबद्दल विचारले असता...

Ashok Kharat Case Update: अशोक खरात याच्या अडचणीत मोठी वाढ झाली असून, आता एसआयटीनंतर अंमलबजावणी संचालनालयाने (ED) या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

Ashok Kharat: अशोक खरातची कोठडीत चांगलीच जिरली! लोकांसमोर यायलाही घाबरतोय, पत्नीबद्दल विचारले असता...

राहुल वाघ, नाशिक

Ashok Kharat Case Update: नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात याच्या भोवती तपासाचा फास अधिकच आवळला गेला आहे. खरातच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी आता अंमलबजावणी संचालनालयाने (ED) आपल्या हातात घेतली आहे. एसआयटीच्या तपास अधिकाऱ्यांसोबत ईडीच्या पथकाने खरातच्या विविध ठिकाणांना भेटी देऊन मालमत्तेची झाडाझडती सुरू केली आहे.

मालमत्तांचे 'बाजारमूल्य' रडारवर

मिळालेल्या माहितीनुसार, ईडीच्या पथकाने खरातच्या खालील ठिकाणांची पाहणी करून मोजणी केली आहे. ईशानेश्वर मंदिराच्या नावाखाली गोळा केलेला निधी आणि मालमत्ता., नाशिकमधील कार्यालय जिथून खरात आपले व्यवहार सांभाळत असे, गौळाणे जवळील प्लॉट येथील मोठ्या जमिनीच्या तुकड्याचे सध्याचे बाजारमूल्य तपासले जात आहे.

या मालमत्ता जमा करण्यामागे खरातचा नक्की उद्देश काय होता? तसेच काही मालमत्तांमध्ये त्याने 'पार्टनर्स' का ठेवले होते? यामागे मनी लाँड्रिंगचा काही प्रकार आहे का, याचा शोध ईडी घेत आहे. खरातचे बँक खाते आधीच सील करण्यात आले असून त्यातील व्यवहारांचे फॉरेन्सिक विश्लेषण सुरू आहे.

(नक्की वाचा-  Iran-US War: जगाला दुहेही धक्का! इराणनंतर आता अमेरिकेकडूनही होर्मुजवर नाकेबंदी; युद्ध पुन्हा भडकणार?)

कोठडीत खरातची 'बोलती बंद' 

तपास यंत्रणांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, खरातच्या वागण्यात मोठा बदल झाला आहे. पोलीस कोठडीच्या सुरुवातीच्या दिवसांत पोलिसांचेच भविष्य सांगण्याचा आव आणणारा खरात आता स्वतःच्या भविष्याबद्दल चिंतेत आहे. आपण लवकर तुरुंगातून बाहेर पडणार नाही, याची त्याला खात्री पटली आहे.

जेवण कमी, बोलणे बंद 

खरात आता कोठडीत कोणाशीही जास्त बोलत नाही आणि त्याने जेवणही कमी केले आहे. लोकांसमोर जाण्याची भीती वाटत असल्याने न्यायालयातील सुनावणी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे (VC) व्हावी, अशी विनंती तो वारंवार करत आहे.

"पत्नी कुठे आहे? देवालाच माहीत!

तपास अधिकाऱ्यांनी खरातला त्याची पत्नी कल्पना हिच्या ठावठिकाण्याबद्दल विचारले असता, त्याने "देवालाच माहीत" असे उडवाउडवीचे उत्तर दिले. मात्र, आपला मुलगा हर्षवर्धन याच्याबद्दल तो कमालीचा हळवा झाला आहे. "मुलाची काळजी वाटते, एकदा फोनवर बोलू द्या," अशी विनंती तो अधिकाऱ्यांना वारंवार करत असल्याचे सूत्रांनी सांगितले.


 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com