Emerging Business Conclave : 'तुम्ही काय केलं, ठाकरे बंधूंना सवाल'; शेलारांनी 1995 पासून कामाचा पाढाच वाचला

NDTV मराठी 'इमर्जिंग बिझनेस कॉन्क्लेव्ह, मुंबई चॅप्टर' या विशेष कार्यक्रमात राज्याच्या विकासाच्या विविध पैलूंवर चर्चा करण्यासाठी माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार उपस्थित होते.

जाहिरात
Read Time: 2 mins

Emerging Business Conclave Mumbai Chapter : महाराष्ट्र आणि देशाच्या विकासाला चालना देण्यासाठी एनडीटीव्ही मराठीने 'इमर्जिंग बिझनेस कॉन्क्लेव्ह, मुंबई चॅप्टर' या विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. कार्यक्रमात राज्याच्या विकासाच्या विविध पैलूंवर चर्चा करण्यासाठी माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार उपस्थित होते. यावेळी त्यांनी भविष्यात महाराष्ट्रात येणाऱ्या एआय आणि ड्रोन उद्योगांवर प्रकाशझोत टाकला. 

यावेळी आशिष शेलार यांनी AI विद्यापीठ, ड्रोन उद्योग यासांरख्या विविध विषयांवर आपली भूमिका मांडली. महाराष्ट्रातील रोजगाराच्या संधी वाढविण्यासाठी विविध धोरणात्मक बदल केले जात असल्याचा त्यांनी विश्वास व्यक्त केला. दरम्यान अद्यापही मुंबई महानगरपालिकेची निवडणूक झालेली नाही. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू आहे, ज्यामुळे भाजपला पालिका निवडणूक कठीण जाऊ शकते अशी चर्चा आहे. यावर बोलताना आशिष शेलार यांनी ठाकरे बंधूंना सवाल उपस्थित केला आणि भाजप केवळ दावा करीत नाही तर काम करते असं ठाम मत मांडलं. 

नक्की वाचा - Emerging Business Conclave : AI मुळे रोजगार कमी होतोय? आशिष शेलारांनी लोकांचा संभ्रम केला दूर

यावेळी ते म्हणाले, ठाकरे बंधूंनी मुंबईसाठी काय केलं, यावेळी त्यांनी भाजपच्या कामाचा पाढाच वाचला.  

ते म्हणाले...

- 1995 ते 1999 दरम्यान मुंबई 52 पूल कोणी बांधले-गडकरींनी बांधले
- मुंबईत 80 ते 90 च्या दगकात इम्पोर्टेड गाडी घेतली तरी धमक्यांचे फोन यायचे. इतकं अंडरवर्ल्ड होतं. त्याचा खात्मा भाजपने, गोपीनाथ मुंडेंनी केला. 
- देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर नऊ मेट्रोचं रूट मुंबई उपनगरातील प्रवाशांना पूरक भाजपने केलं. 
- कोस्टल रोडच्या परवानगी भाजप, फडणवीसांनी आणल्या
- बुलेट ट्रेन प्रकल्प भाजपने आणला.
- मुंबई नवी एअरपोर्टच्या कामाची सुरुवातही भाजपच्या काळातच झाली.
- मुंबईतील वर्सोवा लिंक रोड भाजपने केलं.