
Emerging Business Conclave Mumbai Chapter : महाराष्ट्र आणि देशाच्या विकासाला चालना देण्यासाठी एनडीटीव्ही मराठीने 'इमर्जिंग बिझनेस कॉन्क्लेव्ह, मुंबई चॅप्टर' या विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. महाराष्ट्र आणि देशाच्या विकासाला चालना देण्यासाठी एनडीटीव्ही मराठीने 'इमर्जिंग बिझनेस कॉन्क्लेव्ह, मुंबई चॅप्टर' या विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. कार्यक्रमात राज्याच्या विकासाच्या विविध पैलूंवर चर्चा करण्यासाठी माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार उपस्थित होते. यावेळी त्यांनी भविष्यात महाराष्ट्रात येणाऱ्या एआय आणि ड्रोन उद्योगांवर प्रकाशझोत टाकला. याशिवाय AI बाबत लोकांच्या मनात असलेला संभ्रमही दूर केला.
भविष्यात महाराष्ट्रात एआय विद्यापीठ (AI University in Mumbai) येणार असल्याबद्दल ते म्हणाले, आपण एआय विद्यापीठ मुंबईत आणत आहोत. नवी तंत्रज्ञान आलं की नवीन रोजगारांच्या संधी येतात. त्याच्यासाठी पुरेसे मनुष्यबळ आपण तयार केले पाहिजे. खासगी कंपन्यांचे काही अभ्यासक्रम आहेत. त्यामाध्यमातून तरुणांना एआय फ्रेंडली मनुष्यबळ उभं करणार आहोत. मात्र एआयमुळे नोकऱ्यांवर गदा येईल याबाबत भीती वाटण्याचं कारण नाही. या भीतीवर उत्तर नाही असं मला वाटत नाही.
तंत्रज्ञान येतं तेव्हा विकासाबरोबर भीती घेऊन येतं. इंटरनेट किंवा संगणक आले तेव्हा आपले रोजगार संपतील अशी भीती होती. आम्ही एआयच्या भीतीवर मार्ग काढत आहोत. तंत्रज्ञान नवा रोजगार घेऊन येतंय, डेटा एनलिस्ट, मशीन लर्निगं, कॉम्पुटिंग, आयओटी उपकरणांना हाताळणे, मोबाइल सह कम्प्युटर क्लिनिंग असा नवीन मोठ्या रोजगाराच्या संधीचा फायदा घेता येईल. याशिवाय या विद्यापीठासाठी लागणारी मनुष्यबळाची निर्मिती करण्यात येईल.
महाराष्ट्रात ड्रोन पॉलिसी (Drone Policy)
आम्ही ड्रोन पॉलिसी तयार केली आहे. ड्रोन दीदी नावाचा कार्यक्रम आपण प्रस्तावित केला आहे. आपल्या बहिणी या शेतीमध्ये ड्रोनचा उपयोग प्रभावीपणे करत आहेत. संरक्षण विभागातही ड्रोनचा उपयोग जलद गतीने होत आहे. ड्रोन इंडस्ट्री महाराष्ट्रात यावी, यासाबद्दल जागा ठरवली, पॉलिसी बनवली. ड्रोन क्षेत्रात रोजगाराची मोठी संधी महाराष्ट्रासाठी निर्माण करीत आहोत.
अमित साटम यांना पसंती का दिली?
अमित साटम यांनी मुंबई भाजप अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. याबाबत आशिष शेलार म्हणाले, आम्ही सामूहिक नेतृत्वात काम करतो. एकच विचार, एकच विचार, असं होत नाही. मुंबई भाजपच्या इतिहासात ९ वर्षांपेक्षा जास्त काळ पक्षाने मला नेतृत्वाची जबाबदारी दिली. आम्ही सर्वांनी मिळून ठरवलं. अमित साटम यांचं नेतृत्व धाडसी, साहसी आहे. सर्वात महत्त्वाचं म्गणजे नागरी चळवळीतून आले आहेत. मुंबईतील समस्या यावर ते अधिक चांगलं काम करू शकतील.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world