Emerging Business Conclave Pune Chapter : महाराष्ट्र किंवा भारतामधीलच नाही तर आशिया खंडातील वेगानं वाढणारं शहर अशी पुण्याची ओळख आहे. सांस्कृतिर राजधानी आणि विद्येचं माहेरघर ही पुण्याची पारंपारिक ओळख. पण, आजचं पुणे हे आयटी हब, ऑटोमोबाईल उद्योगांचं केंद्र आणि स्टार्टअप्स संस्कृतीला आत्मसात केलेलं 21 व्या शतकातील आधुनिक शहर बनलं आहे.
पेशव्यांच्या राजधानी म्हणून पुण्याला इतिहासात मोठं महत्त्व होतं. ते पुणं आता आधुनिक नवनिर्मितीचा अविष्कार दाखवणारं शहर बनलं आहे. पुण्यात परंपरा आणि आत्युधनिक प्रगतीचा संगम पाहायला मिळतो. माहिती तंत्रज्ञान (IT), ऑटोमोबाइल, शिक्षण आणि हरित तंत्रज्ञान यांसारख्या क्षेत्रांतील भरभराटीच्या उद्योगांमुळे पुणे हे देशाच्या औद्योगिक नकाशातील एक महत्त्वाचं केंद्र बनलं आहे,
पुणे शहर स्वतःला जागतिक नवनिर्मिती केंद्र (ग्लोबल इनोव्हेशन हब) म्हणून सिद्ध करत असताना, उद्योग, संस्था आणि प्रशासन यांच्यातील संवाद महत्त्वाचा आहे. हा संवाद NDTV मराठीच्या व्यासपीठावर होणार आहे. 'एमर्जिंग बिझनेस कॉन्क्लेव्ह - पुणे चॅप्टर' हे राज्यातील उदयोन्मुख क्षेत्रे, महत्त्वपूर्ण प्रवास आणि भविष्यवेधी कल्पना प्रदर्शित करणारे एक प्रमुख व्यासपीठ आहे.
या कॉनक्लेवमध्ये वेगवेगळ्या तज्ज्ञ व्यक्की तसंच पुण्याचे लोकप्रतिनिधी आणि राज्य सरकार आणि केंद्र सरकारमधील मंत्री पुणे शहराबाबत त्यांचं व्हिजन मांडणार आहेत.
केंद्रीय नागरी वाहतूक राज्यमंत्री आणि पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री तसंच पुणे शहरातील आमदार चंद्रकांत पाटील तसंच शहरविकास, सामाजिक न्याय आणि वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री आणि पुण्यातील आमदार माधुरी मिसाळ यामध्ये सहभागी होणार आहेत.
'NDTV मराठी' च्या वेबसाईटवर तुम्ही या कार्यक्रमाचं कव्हरेज वाचू शकता. तसंच 'NDTV मराठी' च्या YouTube वर तुम्ही हा कार्यक्रम Live पाहू शकाल.