Mumbai News : पालिकेच्या सार्वजनिक शौचालयात थाटला संसार, दारुच्या पार्ट्याही; महिलांची सुरक्षा वाऱ्यावर 

मुंबईतील भांडूप परिसरात एका शौचालयात संसार थाटण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins

Mumbai News : अतिक्रमण हा मुंबईतील मोठा प्रश्न आहे. रस्त्याच्या शेजारी होणाऱ्या अतिक्रमणामुळे पादचाऱ्यांसह वाहतुकीचा मोठा प्रश्न उभा राहतो. दरम्यान मुंबईतील भांडूप परिसरात एका शौचालयात संसार थाटण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 

पालिकेच्या सार्वजनिक शौचालयात थाटला संसार...

भांडुपमधील सुभाष नगर परिसरात एका सार्वजनिक शौचालयात संसार थाटण्यात आल्याचं समोर आलं आहे. या सार्वजनिक शौचालयात गाद्या, बेड, कपडे आढळून आलं आहे. इतकच नाही तर येथे स्वयंपाकघरही आहे. मांडणीवर भांडी लावल्याचं दिसून येत आहे. या सर्व प्रकारामुळे याचा वापर करणाऱ्या महिलांच्या सुरक्षिततेचा मोठा प्रश्न उभा राहिला आहे. 

नक्की वाचा - Thane News : 6 डिसेंबरला सुट्टी घेतली अन् 4 दिवस गायब; घरकामगार महिलेवर मालकीणीचा संताप, ठाण्यात 'गोळीबार'

पाहणीदरम्यान परिस्थिती उघड... 

राष्ट्रवादीच्या मुंबई कार्याध्यक्षा मनिषा तुपे यांनी सुभाष नगर भांडूप परिसरात पाहणी करत असताना एक धक्कादायक प्रकार उघडकीस आणला. सुभाष नगर किन्नी वाडी परिसरात चालू शौचालयातच अनधिकृत रित्या अतिक्रमण करून संसार थाटल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलेला आहे. या ठिकाणी रात्री शौचालयातच बसून मद्यपान केले जाते. नशेत तिकडे लोक बसलेले आढळतात. रात्री अपरात्री महिलांना शौचालयास जायचे असते. ही परिस्थिती अतिशय गंभीर असून येथे महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित झालेला आहे. अशा परिस्थितीत जर एखाद्या मुलीवर, महिलेवर अतिप्रसंग झाला तर याला जबाबदार कोण ? असा प्रश्न यावेळी उपस्थित झालेला आहे.

Advertisement