ऋतिक गणकवार, प्रतिनिधी
ED Raid At Hotel Rangsharda : अंमलबजावणी संचलनालयाने म्हणजेच ईडीने वांद्रे येथील हॉटेल रंगशारदा आणि प्रभादेवी येथील भूखंडावर मोठी कारवाई केली आहे. प्रभुदास वीरचंद लोटिया आणि संबंधीत व्यक्तींविरोधात सुरू असलेल्या तपासादरम्यान हा कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. ईडीने वांद्रे येथील हॉटेल रंगशारदा आणि प्रभादेवी येथील भूखंड, अशा एकूण 332.24 कोटींच्या दोन स्थावर मालमत्ता जप्त केल्या. या दोन्ही मालमत्ता रंगशारदा हॉटेल्स प्रायव्हेट लिमिटेडच्या ताब्यात असल्याची माहिती ईडीने जाहीर केलीय.
वांद्र पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल
मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत करण्यात आलेल्या या कारवाईमुळे प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. या प्रकरणाची चौकशी वांद्रे पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या एफआयआरच्या आधारे सुरू करण्यात आली.रंगशारदा प्रतिष्ठानच्या विश्वस्तांनी प्रभुदास लोटिया आणि रंगशारदा हॉटेल्स प्रा. लि. यांच्या विरोधात फसवणूक व विश्वासघाताची तक्रार दाखल केली होती.
नक्की वाचा >> आजच्या तरुण पिढीला Gen Z का म्हणतात? 90 टक्के लोकांना माहितच नाही, यामागचं कारणही आहे खास
सवलतीच्या दरात रंगशारदा प्रतिष्ठानला भूखंड दिला
ईडीच्या माहितीनुसार,म्हाडाने मराठी नाट्य, साहित्य आणि सांस्कृतिक उपक्रमांना चालना देण्यासाठी सवलतीच्या दरात रंगशारदा प्रतिष्ठानला भूखंड दिला होता.मात्र,या जमिनीचा मूळ उद्देश बाजूला ठेवून तिचा व्यावसायिक वापर करण्यात आल्याचा आरोप आहे.