
संजय तिवारी, प्रतिनिधी
उन्हाचा प्रकोप सध्या वाढत आहे. तापमानामध्ये सातत्यानं वाढ होत असताना एक धोक्याचा इशारा डॉक्टरांनी दिला आहे. उन्हाळ्यात पुरेसे पाणी पिण्याची सावधगिरी बाळगली नाही तर मेंदूला जीवघेणी गाठ होऊ शकते. होय, हे खरे आहे. उन्हाळ्यात सीवीएसटीचा धोका वाढला असून दुर्मिळ सीवी एसटीचे रुग्ण आढळून येत आहेत. नागपुरात असाच एक रुग्ण आढळला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय आहे प्रकरण?
वोकहार्ट रुग्णालयाचे न्यूरोलॉजिस्ट डॉ अमित भट्टी यांनी 'NDTV मराठी' ला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह माहितीनुसार, हा रुग्ण मार्केटिंग क्षेत्रातील असून त्याला सतत फिरतीवर राहणे आवश्यक आहे. अशावेळी, स्वतःच्या प्रकृतीकडे, वेळेवर पाणी पिणे याकडे लक्ष देणे कठीण होत असे. त्यामुळे त्याला डोकेदुखी, फिट्स येणे आणि अर्धे शरीर लकव्याप्रमाणे इत्यादी लक्षणे दिसू लागली.
त्याला रुग्णालयात दाखल करून चाचण्या घेतल्या नंतर कोर्टिगल व्हेनस सायनस थ्रॉम्बॉयसिस झाल्याचे निदान आले. याचा अर्थ मेंदूच्या व्हेनमध्ये रक्त साचून क्लॉट झाल्याने फिट्स तर येत होतेच शिवाय त्यांना तिथे रक्तस्त्राव होऊन अर्धांगवायू देखील झाला होता. त्याला बोलणंही अवघड झाले होते.
( नक्की वाचा : Health News: हेडफोन्सचा अति वापर कानांसाठी किती घातक? काय आहेत दुष्परिणाम? ही बातमी नक्की वाचा )
सामान्यतः अशा रुग्णांच्या क्लॉट ला गोळ्या औषधाने विरघळण्याचा प्रयत्न केला जातो आणि 90 ते 95 टक्के रुग्णांमध्ये तो यशस्वी होतो देखील. मात्र या रुग्णात औषधांना गुण येत नव्हता. फिट्स इतक्या वाढल्या होत्या की जिवाला धोका निर्माण झाला होता. या स्थितीला वैद्यकीय भाषेत स्टेटस एपिलेप्टिकस म्हणतो. क्लॉट मुळे जे रक्त मेंदूतून हृदयात परत यायला हवे ते येत नव्हते उलट तिथे रक्तस्त्राव होऊन त्यांना ब्रेन हॅमरेज झाला होता.
त्यामुळे, आम्ही अधिक वेळ ना घालवता मेकॅनिकल थ्रॉम्बोक्टॉमी केले म्हणजे, त्याच्या पायाच्या व्हेन मधून मेंदूच्या व्हेन मध्ये प्रवेश केला आणि तो ब्लोकेज उघडला. त्यामुळे रुग्णाचे फिट्स पूर्णपणे बंद झाले. चोवीस ते अठ्ठेचाळीस तासात त्यांचा अर्धांगवायू पूर्णपणे बरा झाला आणि त्यांची वाचा पूर्णपणे बरी होऊन ते बोलू लागले.
भट्टी यांनी पुढं सांगितलं की, या पेशंटला त्याच्या नोकरीमुळे एका गावातून दुसऱ्या गावात दुचाकी वाहनाने खूप जास्त प्रवास करणे अनिवार्य होते. या कामाच्या नादात त्याचे पाणी पाण्याकडे दुर्लक्ष होत होते. तापमानामुळे पाण्याचे प्रमाण आणखी कमी होऊन ते अधिक डीहायड्रेट झाले. यामुळे त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला. म्हणून, उन्हाळ्यात भरपूर पाणी पिणे,मिठाचे प्रमाण योग्य ठेवणे, धूम्रपान किंवा अल्कोहोल न घेणे आवश्यक आहे. कारण, त्याने डी हायड्रेशन आणखी वाढते. सातत्याने वाढणारी डोके दुखी असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. त्यानंतर मिरगीचे दौरे, फिट्स किंवा अर्धांगवायू होऊ शकतो.
मेंदूच्या नसांवर दाब वाढून दृष्टी जाण्याचा देखील धोका असतो. महिलांमध्ये गर्भावस्थेत किंवा हार्मोनल पिल् मुळे होऊ शकते. सिकल सेल रुग्णामध्ये देखील हे लक्षण दिसते, असा इशारा त्यांनी दिला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world