Mahesh Tutorials : प्रसिद्ध कोचिंग क्लासेस महेश ट्युटोरियलला टाळं? राज्यातील 33 शाखा बंद झाल्याची माहिती

शिक्षण क्षेत्रातून मोठी बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध कोचिंग क्लासेस महेश ट्युटोरियल्स बंद झाल्याची माहिती समोर आली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

ऋतिक गणकवार, प्रतिनिधी

Mumbai News : शिक्षण क्षेत्रातून मोठी बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध कोचिंग क्लासेस महेश ट्युटोरियल्स बंद झाल्याची माहिती समोर आली आहे. महाराष्ट्रात याच्या ३३ शाखा सुरू होत्या होत्या. या सर्व शाखा बंद करण्यात आल्याची माहिती आहे. या वृत्तानंतर विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये खळबळ उडाली आहे.  

१९८८ मध्ये महेश शेट्टी यांनी महेश ट्युटोरियल क्लासेसची सुरुवात केली, तब्बल ३८ वर्षांनंतर राज्यातील सर्व कोचिंग क्लासेस बंद करण्यात आले असून अनेक शिक्षकांना राजीनामा देण्यास सांगण्यात आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचं मोठं नुकसान होणार आहे. राज्यातील सर्व क्लासेसमध्ये मिळून ३००० हून अधिक विद्यार्थी शिकत होते. त्यांची वर्षभराची फीदेखील भरली होती. मात्र अचानक मध्येच क्लासेस बंद झाल्याने जवळपास 3000 हजार विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचा आरोप केला जात आहे.  

Advertisement

महेश ट्युटोरियलच्या राज्यातील ३३ शाखा बंद...

महेश ट्युटोरियल क्लासेसमध्ये शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना अरिहंत कोचिंग क्लासेमध्ये शिफ्ट केल्याची माहिती पालकांकडून देण्यात आली आहे. मुंबईतील अंधेरीतील ब्रांचदेखील 4 दिवसांपूर्वी बंद करण्यात आली. पालकांनी यासंदर्भात शिक्षण मंत्री दादा भुसे यांना निवेदन दिलं. महेश ट्युटोरियल्सच्या अधिकाऱ्यांनी अरिहंत अकादमीच्या व्यवस्थापनाची भेट घेऊन आपल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या शाखांमध्ये सामावून घेण्याची विनंती केली. अरिहंत अकादमीने देखील याला होकार दिला. त्यामुळे महेश ट्युटोरियल्सची सर्व मुलं यापुढे अरिहंत अकादमीमध्ये कोचिंग घेतील. मात्र अचानक शिक्षक बदलल्याने मुलांना त्रास होऊ शकतो असं मत पालकांनी मांडलं आहे.  

नक्की वाचा - Success story : वय अवघं 26, आयआयटीयन सिद्धार्थने एकाच दिवसात कमावले चक्क 77 कोटी, पणं कसे?

महत्त्वाचं म्हणजे महेश ट्युटोरिअल्समध्ये अनेक शिक्षक देखील कार्यरत होते आणि त्यांचे देखील आता मोठे नुकसान झालं आहे. अकॅडमी वर्ष सुरू झाल्याने आता त्यांना दुसरीकडे नोकरी मिळणं देखील  कठीण झालं आहे. महेश ट्युटोरियल्स  क्लासेसच्या अधिकाऱ्यांनी शिक्षकांना सांगून पालकांसोबत बैठक घेण्यास सांगितली. मात्र क्लासेस बंद का केले जातं आहेत याचं कारण अद्याप देण्यात आलेलं नाही. या सर्व बाबींमुळे आता खाजगी क्लासेस संदर्भातला कायदा पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरणार आहे. 


Topics mentioned in this article