Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरच्या फारोळा गावात एक विचित्र प्रकार घडला आहे. आठ दिवसांपूर्वी या गावातील एका गायीच्या वासरूला पिसाळलेला कुत्रा चावला. काल सकाळी या वासराचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे वासरू गायीचं दूध पित असल्याने गायीला देखील याचं इन्फेक्शन झाल्याची अफवा गावात पसरली.
या गाईचं दूध गावातील अनेक घरांना पुरवठा केला जात होता. त्यामुळे आपल्याला देखील इन्फेक्शन होईल, म्हणून अख्ख गाव शासकीय रुग्णालयात रेबीजच इंजेक्शन घेण्यासाठी पोहचेले आहे. परिस्थिती अशी आहे की रुग्णालयात इंजेक्शन पुरत नाही. लोक रुग्णालयात रांगा लावून इंजेक्शन घेत आहे.
(नक्की वाचा- Pune News : 'बँक ऑफ बडोदा'च्या मॅनेजरने बँकेतच संपवलं आयुष्य; सुसाइड नोटही सापडली)
मिळालेल्या माहितीनुसार, गावात दहशतीचं वातावरण आहे. रेबीजच्या भीतीने संपूर्ण गावातील नागरिकांनी शुक्रवारपासून बिडकीनच्या शासकीय रुग्णालयात इंजेक्शन घेण्यासाठी गर्दी केली आहे. मात्र एवढ्या गर्दीला पुरेल एवढा इंजेक्शनचा साठा देखील रुग्णालयात उपलब्ध नाही. त्यामुळे रुग्णालयात गोंधळाची स्थिती आहे. शुक्रवारपासून इंजेक्शनसाठी सुरु झालेली नागरिकांची गर्दी संपायचं नाव घेत नाही.
(नक्की वाचा- Pandharpur News: विठुरायाच्या भेटीला आल्या अन् अनर्थ घडला.. चंद्रभागेत बुडून 2 महिलांचा मृत्यू)
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत हजार लोकांनी इंजेक्शन घेतलं आहे. बिडकीन शासकीय रुग्णालयात इंजेक्शन घेण्यासाठी लोकांची अक्षरशः रांग लागली आहे. आता या शासकीय रुग्णालयात देखील इंजेक्शन कमी पडत असल्याने बाजूच्या गावातील शासकीय रुग्णालयात लोकांना जाण्याचा सल्ला दिला जात आहे.
विशेष म्हणजे एक वर्षांपूर्वी याच गावात अशीच एक घटना समोर आली होती. एका गायीच्या वासराला कुत्रा चावला, हा तरुण वासराच्या संपर्कात आला. आणि काही दिवसांनी त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे पुन्हा अशी घटना घडू नये म्हणून गावकरी इंजेक्शन घेण्यासाठी रुग्णालयात धाव घेत आहे.