
देवा राखुंडे, बारामती
Pune News : पुण्याच्या बारामतीमध्ये बँक ऑफ बडोदाच्या शाखा व्यवस्थापकाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. बारामतीमधील भिगवण रोडवरील बँक ऑफ बडोदाच्या शाखेत व्यवस्थापक शिवशंकर मित्रा (52 वर्ष) यांनी गुरुवारी (17 जुलै) रात्री बँकेच्या शाखेतच गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. शिवशंकर मित्रा हे मूळचा उत्तर प्रदेशचे रहिवासी होते.
शिवशंकर मित्रा यांनी लिहिलेल्या चिठ्ठीनुसार त्यांनी पाच दिवसांपूर्वीच बँकेकडे अतिरिक्त दबाव सहन होत नसल्याने स्वेच्छानिवृत्ती मागितली होती. मात्र बँकेच्या वरिष्ठ स्तरावरून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने अखेर गुरुवारी रात्री त्यांनी आत्महत्या केली असल्याचं कारण समोर येत आहे. मात्र पोलीस खात्याकडून याला अद्याप कोणताही दुजोरा मिळालेला नाही.
(नक्की वाचा- Pune Crime News: पुण्यात चाललंय काय? गुन्हेगाराचा पोलीस स्टेशनमध्येच तोडफोड करत राडा)
शिवशंकर मित्रा यांनी लिहिलेल्या चिठ्ठीत नमूद केले की, "मी शिवशंकर मित्रा, मुख्य प्रबंधक बँक ऑफ बडोदा बारामती, मी आज बँकेच्या अतिरिक्त दबावाच्या कारणामुळे आत्महत्या करत आहे. माझी बँकेकडे विनंती आहे की, कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त दबाव टाकू नका. सर्वांना आपापल्या जबाबदारीची पूर्णपणे जाणीव आहे आणि ते 100 टक्के आपले योगदान देत असतात."
(नक्की वाचा- Awhad Vs Padalkar: जितेंद्र आव्हाडांनी गोपीचंद पडळकरांन 'मंगळसूत्र चोर' का म्हटलं? काय आहे कारण?)
मी पूर्णपणे शुद्धीत असताना आणि स्वतःच्या इच्छेने आत्महत्या करत आहे. त्याच्यामध्ये माझ्या कुटुंबाची कोणतीही चूक नाही. कोणालाही जबाबदार धरू नये. मी फक्त बँकेच्या प्रचंड दबावामुळे आत्महत्या करत आहे. पत्नी प्रिया यांना उद्देशून त्यांनी, प्रिया, मला माफ कर. माही मला माफ कर! असे त्यांनी पत्नी प्रिया आणि मुलगी माही यांना लिहिलेलं आहे. शक्य झाल्यास माझे डोळे दान करावेत, अशी देखील इच्छा शिवशंकर मित्रा यांनी व्यक्त केली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world