नागिंद मोरे, प्रतिनिधी
Dhule Rain Update : धुळे जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे धुळे तालुक्यातील वणी-आंबोडे येथील कणेरी नदीला पूर आला असून गावाचा संपर्क तुटला आहे. पुराच्या पाण्यात चार जण वाहून गेल्याची माहिती मिळाल्यानंतर जिल्हा प्रशासनाने तातडीने शोधमोहीम सुरू केली. त्यापैकी दोन जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले,मात्र दोन जण अद्याप बेपत्ता आहेत.बेपत्ता झालेल्यांमध्ये आनंदा पारखे आणि त्यांचा मुलगा दिनेश आनंदा पारखे यांचा समावेश असून दुकानातील फ्रिज वाचवण्याच्या प्रयत्नात दोघेही पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
पुराच्या पाण्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला
धुळे जिल्ह्यात गेल्या अनेक तासांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.नद्या-नाले दुथडी भरून वाहत असून अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.दरम्यान,धुळे तालुक्यातील वणी-आंबोडे येथून अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे.कणेरी नदीला आलेल्या पुरात चार जण वाहून गेल्याची माहिती मिळाली होती.त्यापैकी दोन जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले असून दोन जण अद्याप बेपत्ता आहेत. विशेष म्हणजे, दुकानातील फ्रिज वाचवण्याच्या प्रयत्नात बाप-लेक पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
नक्की वाचा >> Pune News: खडकवासला धरणातून 45 हजार क्युसेक विसर्ग, एकतानगरीत पूरस्थिती, 'या' सोसायट्यांमध्ये शिरलं पाणी
बेपत्ता झालेल्या बाप-लेकाचा शोध सुरू
या घटनेला पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांनी दुजोरा दिला असून दोन जण बेपत्ता असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.प्रशासनाने नागरिकांना पूरग्रस्त भागात जाणे टाळावे,नदी-नाल्यांच्या परिसरात गर्दी करू नये तसेच कोणताही धोका पत्करू नये,असे आवाहन केले आहे.सध्या संपूर्ण जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.
नक्की वाचा >> Yavatmal News: यवतमाळ जिल्ह्याला पुराचा तडाखा! 'या' धरणाचे 20 दरवाजे उघडले, 'त्या' गावांना सतर्कतेचा इशारा
बेपत्ता बाप-लेकाचा शोध सुरू असून त्यांच्या सुखरूप सुटकेसाठी सर्व यंत्रणा प्रयत्नशील आहेत.या घटनेला पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांनी दुजोरा दिला असून बेपत्ता दोघांचा शोध घेण्यासाठी पोलीस,महसूल आणि बचाव पथकांकडून युद्धपातळीवर शोधमोहीम सुरू आहे.नागरिकांनी पूरग्रस्त भागात जाणे टाळावे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे,असे आवाहन करण्यात आले आहे.