Crime News : महिला कीर्तनकाराची आश्रमात दगडाने ठेचून हत्या; संभाजीनगरमधील घटनेने खळबळ

Chhatrapati Sambhajinagar crime news : संगीताताई एका मंदिरात राहत होत्या. मात्र संगीताताई यांची आश्रमात घुसून हत्येमुळे केल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला. एका महिला कीर्तनकाराची डोक्यात दगड घालून हत्या करण्यात आली आहे. वैजापूर तालुक्यातील चिंचडगाव शिवारात ही घटना घडली असून, शनिवार अंदाजे  सकाळी ६.३० वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली आहे. संगीता अण्णासाहेब पवार असे हत्या करणात आलेल्या महिला कीर्तनकाराचे नाव आहे.  50 वर्षीय संगीता पवार राहणार चिंचडगाव येथील रहवासी आहेत.

(नक्की वाचा-  Crime News : भूत उतरवण्याचा नावाखाली अडीच वर्षाच्या मुलाला चटके देत वेताच्या छडीने मारहाण, मुंबईतील धक्कादायक प्रकार)

पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितींनुसार, चिंचडगाव येथील सदगुरू नारायणगिरी महाराज कन्या आश्रम संगीता पवार वास्तव्यास होत्या.  त्यामुळे नेहेमीप्रमाणे त्या शुक्रवारी रात्री देखील आश्रमातच होत्या. पण दुसऱ्या दिवशी सकाळी आश्रमातील मंदिरातील पुजारी शिवाजी चौधरी पूजेसाठी पोहचले. यावेळी त्यांनी संगीता पवार यांना आवाज दिला. पण त्यांना कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी मंदिराच्या बाजूलाच असलेल्या शेडमध्ये जाऊन पाहिले, असता त्यांना धक्काच बसला. कारण संगीता पवार या रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या होत्या. पुजारी चौधरी यांनी तात्काळ विरगाव पोलिसांना फोन करून घडलेली घटनाक्रम सांगितलं. 

घटनास्थळी वेगवेगळे पथक दाखल

घटनेची माहिती मिळताच पोलिसांचं पथक घटनास्थळी पोहचले. विरगाव पोलीस ठाण्याचे  सहाय्यक पोलिस निरीक्षक शंकर वाघमोडे देखील घटनास्थळी पोहचले. याबाबत त्यांनी वरिष्ठांना देखील याची माहिती दिली. त्यानंतर  श्वान पथक, फॉरेन्सिक टीम, ठसे तज्ञ देखील पोहचले. सोबतच उपविभागीय पोलिस अधिकारी फुंदे यांनी देखील घटनास्थळी धाव घेतली.

(नक्की वाचा : Kalyan : कल्याणमध्ये अडीच वर्षाच्या मुलाला पळवण्याचा प्रयत्न, आईच्या समोरच घडला थरारक प्रकार! )

नेमकं काय घडलं?

याबाबत बोलताना उपविभागीय पोलिस अधिकारी फुंदे  यांनी म्हटले आहे की, चिंचडगाव येथे रस्त्याच्या कडेला एक मोहटा देवीचं मंदिर आहे. याच ठिकाणी संगीता पवार राहत होत्या आणि पूजाअर्चा करत होत्या. काल रात्री एकट्याच होत्या आणि त्या झोपल्या असताना कोणतीतरी त्यांच्या डोक्यात दगड घालून त्यांची हत्या केल्याचं प्रथमदर्शनी दिसत आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहे. तपासाच्या दृष्टीने वेगवेगळे पथक घटनास्थळी आले आहे. तसेच सर्वच दृष्टीने आम्ही तपास करत आहोत आणि खऱ्या गुन्हेगाराला लवकरच अटक करू असे फुंदे म्हणाले.

Advertisement
Topics mentioned in this article