जाहिरात

Crime News : भूत उतरवण्याचा नावाखाली अडीच वर्षाच्या मुलाला चटके देत वेताच्या छडीने मारहाण, मुंबईतील धक्कादायक प्रकार

Mumbai Crime News : संबंधित दाम्पत्य भांडुप परिसरातील जंगल मंगल परिसरात राहत होते. वैभव कोकरे आणि हर्षदा गुरव कोकरे असे दाम्पत्याचे नाव आहे.

Crime News : भूत उतरवण्याचा नावाखाली अडीच वर्षाच्या मुलाला चटके देत वेताच्या छडीने मारहाण, मुंबईतील धक्कादायक प्रकार

Mumbai Crime News : भूत उतरवण्याचा नावाखाली अडीच वर्षाच्या मुलाला चटके देत वेताच्या छडीने मारहाण केल्याची धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मारहाण करणाऱ्या दाम्पत्याने अटकेनंतरही पोलीस ठाण्यात मंत्रोपचार सुरूच ठेवले.  भांडुप पोलिसांनी दाम्पत्याला फिल्मी स्टाईलने अटक केली. विशेष म्हणजे हे दाम्पत्य अनाथ मुलांसाठी संस्था उघडण्याच्या तयारीत होते. 

(नक्की वाचा : Kalyan : कल्याणमध्ये अडीच वर्षाच्या मुलाला पळवण्याचा प्रयत्न, आईच्या समोरच घडला थरारक प्रकार! )

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित दाम्पत्य भांडुप परिसरातील जंगल मंगल परिसरात राहत होते. वैभव कोकरे आणि हर्षदा गुरव कोकरे असे दाम्पत्याचे नाव आहे.  दोघेही 14 वर्ष लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. दीर्घ काळ एकत्र राहिल्यानंतर दोघांनी गेल्या आठवड्यातच लग्न केले होते. हर्षदा ही यापूर्वी ठाणे जिल्हा परिषदेत कंत्राटदार पद्धतीने शिपाई या पदावर काम करत होती. 

मुलाला मारहाण केल्याची तक्रारदाराने तक्रार केल्यानंतर पोलीस कारवाईच्या भीतीने दोघेही घराला टाळे लावून पळून गेले होते.  मात्र पोलिसांनी फोन लोकेशनवरून दोघांचा पत्ता शोधून काढला. भांडुपहून दोघे जण घणसोली येथे गेल्यानंतर त्यांची रिक्षा पार्क असल्याचे पोलिसांना निदर्शनास आले.  

(नक्की वाचा-  Dombivli : डोंबिवलीच्या हायप्रोफाईल सोसायटीमध्ये सापडले 2 कोटींचे ड्रग्ज! घर पाहून पोलीसही हादरले)

पोलिसांनी गाडीचे कागदपत्र चेक करायचे आहेत, घेऊन या असे सांगत त्यांना इमारतीखाली बोलावून घेतले आणि त्याला अटक केली. आरोपींकडून सात जादूटोणा संदर्भातील पुस्तके, नारळ तसेच अघोरी पूजेसाठी लागणारे साहित्य जप्त केले आहे. पोलिसा याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. 
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com