रेवती हिंगवे, प्रतिनिधी
Pune News Today : पुणेकरांसाठी सर्वात महत्त्वाची बातमी समोर आली आहे. बजाज पुणे ग्रँड टूर ही आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे. ही स्पर्धा 19 तारखेला संध्याकाळी 10 ते संध्याकाळी 6 या वेळी आयोजित करण्यात येणार आहे.जगभरातील नामांकित 171 सायकलिस्ट 40 देशातून सहभागी होणार आहेत. त्यामुळे फर्ग्युसन कॉलेज रोड, गणेश खिंड रोड, जंगली महाराज रस्ता या या कालावधीत हे तिन्ही रस्ते वाहतुकीसाठी पूर्णत: बंद करण्यात येणार आहेत. पुण्यात होणाऱ्या सायकल स्पर्धेसाठी हे रस्ते बंद राहणार आहेत. नागरिकांनी पर्यायी मार्ग वापरण्याचं आवाहन पुणे वाहतूक पोलिसांकडून करण्यात आलं आहे. याबाबतची सविस्तर माहिती पुणे शहराचे पूर्व प्रादेशिक विभागाचे अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी दिली आहे.
पुणेकरांनी ही माहिती वाचाच, काय म्हणाले अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील?
"बजाज पुणे ग्रँड टूर ही आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे. ही स्पर्धा 19 तारखेला संध्याकाळी 10 ते संध्याकाळी 6 यावेळत आयोजित करण्यात येणार आहे.जगभरातील नामांकित 171 सायकलिस्ट 40 देशातून सहभागी होणार आहेत. फर्ग्युसन कॉलेज रोड, गणेश खिंड रोड, जंगली महाराज रस्ता यावर ही स्पर्धा आयोजित होत आहे. त्यामुळे या कालावधीत हे तिन्ही रस्ते वाहतुकीसाठी पूर्णत: बंद करण्यात येत आहेत. या रस्त्यावर पार्किंग सुद्धा करता येणार नाही. लॉ कॉलेज रोडवरून बीएसीसी रोडवर यायचं असेल,भांडारकर रोडवर यायचं असेल, मॉडेल कॉलनीत येऊन तुम्हाला गाड्या पार्क करता येतील.तसच भोसले नगरमध्येही गाड्या पार्क करून स्पर्धा पाहण्यासाठी येऊ शकता.
नक्की वाचा >> नवनीत राणांची भाजपमधून हकालपट्टी होणार? भाजपच्या 22 उमेदवारांचं फडणवीसांना पत्र, अमरावती महापालिकेत भलताच गेम
पर्याय म्हणून एक रिंग रोड तयार करण्यात आला आहे. जसं की नळ स्टॉप, लॉ कॉलेज रोड, सेनापती बापट रोड, औंध रोड, पुढे जुना पुणे मुंबई रस्ता ते आरटीओ, आरटीओ शाहीरामर चौक ते गाडगीळ पुतळा आणि नदीकाठच्या रस्त्यातून पुन्हा शास्त्री रोड, सेनादत्त चौकी ते नळस्टॉप..या रिंगरोडचा जर वापर केला, तर निश्चित तुमची गैरसोय कमी होईल.मुख्य रस्ते जरी वाहतुकीसाठी बंद असले, तरी त्याला जोडणारे जे रस्ते आहेत याचा वापर बफर झोन म्हणून नागरिकांना करता येईल. नागरिकांना विनंती आहे की, या भागात स्पर्धा बघायला येण्यासाठी किंवा कामासाठी येण्यासाठी मेट्रोचा जर वापर केला तर निश्चित फायदेशीर होईल.स्पर्धेचा कालावधी सकाळी 9 ते संध्याकाळी 6 असल्यामुळे या सर्कलमधील शाळा, कॉलेजेस आणि शैक्षणिक संस्था या कालावधीत बंद असणार आहेत", अशी माहिती मनोज पाटील (अप्पर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर) यांनी दिली आहे.