जाहिरात

Bengaluru Ola Engineer Suicide: ओला इंजिनिअर आत्महत्या प्रकरण: भाविष अग्रवाल यांच्यासह इतरांवर गुन्हा दाखल

के. अरविंद असे आत्महत्या केलेल्या इंजिनिअरचे नाव आहे. ते 2022 पासून ओला इलेक्ट्रिकमध्ये होमोलॉगेशन इंजिनिअर म्हणून कार्यरत होते. 28 सप्टेंबर रोजी अरविंद यांनी बंगळूरुच्या चिक्कलसंद्रा येथील त्यांच्या निवासस्थानी विष प्राशन केले होते.

Bengaluru Ola Engineer Suicide: ओला इंजिनिअर आत्महत्या प्रकरण: भाविष अग्रवाल यांच्यासह इतरांवर गुन्हा दाखल
  • Ola Engineer K Aravind died by suicide on September 28 in Bengaluru after consuming poison
  • Aravind left a 28-page note accusing Ola superiors including Bhavish Aggarwal of harassment
  • Ola denied prior complaints, challenged the FIR, and said it is cooperating with the investigation
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.

बंगळूरुमध्ये ओला इलेक्ट्रिक कंपनीत कार्यरत असलेल्या एका 38 वर्षीय इंजिनिअरने आत्महत्या केली होती. या घटनेनंतर, कंपनीचे संस्थापक भाविष अग्रवाल यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांवर मानसिक छळ आणि आर्थिक शोषणाचे गंभीर आरोप करणारे 28 पानी लिखित चिठ्ठी समोर आली आहे. या चिठ्ठीच्या आधारावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

काय आहे नेमके प्रकरण?

के. अरविंद असे आत्महत्या केलेल्या इंजिनिअरचे नाव आहे. ते 2022 पासून ओला इलेक्ट्रिकमध्ये होमोलॉगेशन इंजिनिअर म्हणून कार्यरत होते. 28 सप्टेंबर रोजी अरविंद यांनी बंगळूरुच्या चिक्कलसंद्रा येथील त्यांच्या निवासस्थानी विष प्राशन केले होते. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, मात्र त्याच दिवशी त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या भावाला 28 पानांची चिठ्ठी सापडली. ज्यात त्यांनी त्यांचे वरिष्ठ सुब्रत कुमार दास आणि भाविश अग्रवाल यांच्यावर कामाच्या ठिकाणी मानसिक छळ, दबाव आणि पगार तसेच भत्ते देण्यास नकार दिल्याचा आरोप केला आहे. याच कारणामुळे आपण आत्महत्या करत असल्याचे त्यांनी चिठ्ठीत नमूद केले होते.

अरविंद यांच्या भावाच्या तक्रारीवरून पोलिसांनी 6 ऑक्टोबर रोजी भाविश अग्रवाल, सुब्रत कुमार दास आणि इतरांविरुद्ध आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

संशयास्पद बँक व्यवहार आणि कुटुंबाचे आरोप

अरविंद यांच्या कुटुंबीयांनी केवळ मानसिक छळाचाच नाही, तर आर्थिक शोषणाचे आणि संशयास्पद व्यवहाराचे आरोपही केले आहेत. अरविंद यांच्या मृत्यूनंतर दोन दिवसांनी त्यांच्या खात्यात NEFT द्वारे 17,46,313 रुपये संशयास्पद पद्धतीने जमा झाले. या व्यवहाराबाबत स्पष्टीकरण विचारण्यासाठी अरविंद यांच्या भावाने ओला कंपनीशी संपर्क साधला असता, दास यांनी अस्पष्ट उत्तरे दिल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर कंपनीचे तीन प्रतिनिधी अरविंद यांच्या घरी आले, परंतु त्यांनीही या आर्थिक हस्तांतरणाबद्दल सुसंगत माहिती दिली नाही. यामुळे कंपनीच्या हेतूंबद्दल कुटुंबात शंका वाढल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

ओला कंपनीचे स्पष्टीकरण

या घटनेनंतर ओला कंपनीने एक निवेदन जारी केले आहे, ज्यात त्यांनी मृत कर्मचाऱ्याबद्दल शोक व्यक्त केला आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, अरविंद गेल्या साडेतीन वर्षांपासून कंपनीत कार्यरत होते, पण त्यांनी त्यांच्या नोकरीबाबत किंवा कोणत्याही छळाबाबत कधीही तक्रार केली नव्हती. ओलाने दावा केला आहे की, अरविंद यांच्या कामाच्या भूमिकेत कंपनीचे संस्थापक भाविष अग्रवाल यांच्यासह शीर्ष व्यवस्थापनाशी कोणताही थेट संवाद नव्हता. कंपनीने त्यांचे संस्थापक आणि इतर अधिकाऱ्यांविरुद्ध दाखल केलेल्या एफआयआरला कर्नाटक उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.

Helplines
Vandrevala Foundation for Mental Health9999666555 or help@vandrevalafoundation.com
TISS iCall022-25521111 (Monday-Saturday: 8 am to 10 pm)
(If you need support or know someone who does, please reach out to your nearest mental health specialist.)

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com