छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मध्यरात्रीच्या सुमारास एका प्लास्टिकच्या दुकानाला भीषण आग लागली. ज्यात तिघांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर दोघांचा सुदैवाने जीव वाचला आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दल आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर आग विझवण्यात अग्निशामक दलाला यश आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फुलंब्री शहरातील दरी फाटा येथे एका प्लास्टिकच्या दुकानाला रात्री एक ते दीड वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. दुकानाला आग लागल्याची माहिती दुकान मालकाला मिळतात त्याने घटव घेतली. याचवेळी काही स्थानिक तरुण देखील त्या ठिकाणी पोहोचले. आग एवढी भीषण होती की दुकानाचा शेटर आगीच्या प्रेशरने बाहेरच्या बानास्थळी धाजूला वाकला होता. त्यामुळे दुकान मालक सलीम शेख यांच्यासह काही तरुणांनी दुकानाचे शेटर उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र, अचानक आगीच्या प्रेशरने स्फोट होऊन शेटर जोरात बाहेर फेकले गेले. त्यामुळे शेटर उघडण्यासाठी गेलेल्या तरूण शेटरचे लोखंडी पार्ट लागून आणि आगीत होरपळून जखमी झाले. यातील तिघांचा मात्र मृत्यू झाला. नितीन नागरे (वय 25 वर्षे), गजानन वाघ (वय 30 वर्षे), दुकान मालक सलीम शेख वय (25 वर्षे) असे मयत तरुणांचे नावं आहेत.
घटनास्थळी पोलीस दाखल
फुलंब्री शहरातील दरी फाटा येथे एका प्लास्टिकच्या दुकानाला आग लागल्याची माहिती मिळताच फुलंब्री पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी स्थानिक नागरिक आणि अग्निशामक दलाच्या मदतीने आगीवर व नियंत्रण मिळवलं. दरम्यान आता पोलिसांकडून या घटनेचा पंचनामा केला जात असल्याची माहिती मिळत आहे.
परिसरात हळहळ
प्लास्टिकच्या दुकानाला आग लागून मयत झालेले तिन्ही तरुण फुलंब्री शहरातील रहिवासी आहे. या घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. आज सकाळपासून देखील अनेकजण या ठिकाणी गर्दी करताना पाहायला मिळत आहे. तर या घटनेत तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती परिसरात कळताच हळहळ व्यक्त केली जात आहे.