VIDEO: स्वयंचलित दरवाजे, मोठ्या खिडक्या अन् बरंच काही; अ‍ॅडव्हान्स लोकल ट्रेन मुंबईत दाखल, पण...

Mumbai Local Train : मुंबईकरांच्या प्रवासाचा चेहरामोहरा बदलणारी देशातील पहिली विना-एसी स्वयंचलित दरवाजांची लोकल अखेर कुर्ला कारशेडमध्ये दाखल झाली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Photo Credit- Twitter (@Shashankrao06)
Photo Credit- Twitter (@Shashankrao06)

मुंबईची लाईफलाईन मानल्या जाणाऱ्या उपनगरीय रेल्वेच्या ताफ्यात सोमवारी एक ऐतिहासिक भर पडली. देशातील पहिली विना-एसी स्वयंचलित दरवाजांची (Automatic Door-Closing) लोकल ट्रेन चेन्नईच्या इंटिग्रल कोच फॅक्टरीतून (ICF) मुंबईतील कुर्ला कारशेडमध्ये दाखल झाली आहे. ही नवीन ट्रेन केवळ सुरक्षितच नाही, तर प्रवाशांच्या सोयीसुविधांच्या दृष्टीनेही अत्यंत आधुनिक आहे.

सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य

मुंब्रा येथे झालेल्या दुर्दैवी अपघातानंतर, जिथे प्रवाशाचा दरवाजातून पडून मृत्यू झाला होता, रेल्वे बोर्डाने नॉन-एसी गाड्यांनाही स्वयंचलित दरवाजे लावण्याचा निर्णय घेतला होता. यामुळे धावत्या ट्रेनच्या उघड्या दरवाजातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे अपघात आणि पडण्याच्या घटना पूर्णपणे थांबणार आहेत.

Advertisement

पाहा VIDEO

नव्या लोकलची खास वैशिष्ट्ये

सध्याच्या लोकलमध्ये 900 मिमीच्या खिडकीऐवजी, या ट्रेनमध्ये 1900 मिमीच्या मोठ्या खिडक्या आहेत, ज्यामुळे डब्यात जास्त उजेड आणि हवा येईल.डबे बंद असूनही हवा खेळती राहण्यासाठी प्रत्येक डब्यात दोन हाय-कॅपॅसिटी ब्लोअर्स लावले आहेत, जे दर तासाला 10 हजार घनमीटर हवा पुरवतील. या लोकलचे लगेज डबे सध्याच्या लोकलपेक्षा दुप्पट मोठे आहेत. प्रवाशांना बसण्यासाठी दोन सीटमध्ये जास्त जागा देण्यात आली असून डब्यातील रस्ताही रुंद करण्यात आला आहे.

(नक्की वाचा-  Badlapur News: आंबेडकर जयंतीच्या पूर्वसंध्येला संविधान चौक तोडफोडीचा प्रयत्न; महिलेला अटक)

ही ट्रेन 6-6 डब्यांच्या दोन युनिट्समध्ये विभागलेली असून ते एकमेकांना जोडलेले आहेत जरी ही ट्रेन एकमेकांना जोडलेली असली, तरी महिला, प्रथम श्रेणी आणि सामान्य डब्यांमध्ये स्पष्ट विभाजन करण्यात आले आहे.दिव्यांग प्रवाशांसाठी विशेष राखीव डब्यांची रचना यात करण्यात आली आहे. 'मिड डे'ने याबाबत सविस्तर वृत्त प्रसिद्ध केलं आहे. 

रेल्वे प्रशासनापुढील आव्हाने

ही ट्रेन अत्याधुनिक असली तरी, रेल्वे अधिकाऱ्यांनी काही चिंताही व्यक्त केल्या आहेत. या ट्रेनच्या डब्यांची रचना सध्याच्या लोकलपेक्षा वेगळी असल्याने प्लॅटफॉर्मवर प्रवाशांची थोडी धावपळ होऊ शकते. तसेच, स्वयंचलित दरवाजे उघडण्या आणि बंद होण्याच्या प्रक्रियेमुळे ट्रेनचा थांब्याचा वेळ वाढून वेळापत्रकावर परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Topics mentioned in this article