अविनाश पवार, प्रतिनिधी
Bhimashankar Latest News : उन्हाळ्याची तीव्रता वाढत असताना डोंगर आणि जंगल परिसरात वणवे लागण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ होत आहे. पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर परिसर हा जैवविविधतेच्या दृष्टीने अतिसंवेदनशील मानला जातो.मात्र,याच भागात सातत्याने लागणाऱ्या आगीमुळे पर्यावरणावर गंभीर परिणाम होत असल्याचे चित्र समोर येत आहे. या वणव्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वृक्ष जळून खाक होत असून सरपटणारे जीव,पक्षी आणि वन्यप्राणी आगीच्या भक्ष्यस्थानी पडत आहेत.परिणामी,या भागातील जैवविविधतेला मोठा धोका निर्माण झाला आहे.
वन विभागाकडून जंगल परिसरात आणि राखीव वनाभोवती ‘जाळ पट्टे'(फायर लाईन) तयार करून आग पसरण्यापासून रोखण्याचे प्रयत्न केले जातात.तसेच,संशयास्पद हालचाली आढळल्यास संबंधितांवर कारवाईही केली जाते.तरीदेखील,गेल्या काही वर्षांत राखीव जंगलांमध्ये आगीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे दिसून येत आहे.
नक्की वाचा >> Baramati News: सुनेत्रा पवारांचा ऐतिहासिक विजय, पण 'त्या' बॅनरने अनेकांची झोप उडवली, "अजितदादा पवार.."
झाडे जाळून त्यापासून कोळसा तयार करतात आणि..
दरम्यान काही ठिकाणी डोंगर पेटवल्यानंतर जनावरांसाठी चांगला चारा उगवतो,असा गैरसमज ग्रामस्थांमध्ये असल्याचेही समोर आले आहे या चुकीच्या समजुतीमुळे मुद्दाम डोंगरांना आग लावण्याचे प्रकार घडत आहेत. याशिवाय, झाडे जाळून त्यापासून कोळसा तयार करून विक्री करण्याचाही प्रकार उघडकीस येत आहे. काही घटनांमध्ये डिझेल टाकून जाणीवपूर्वक आग लावल्याचेही निदर्शनास आले आहे.
नक्की वाचा >> Buldhana News: खामगाव शहरात खळबळ! पत्नीने घटस्फोटाची मागणी केली, नंतर घडली सर्वात भयंकर घटना, 4 जणांनी..
वणवे लावणाऱ्या समाजकंटकांवर कठोर कारवाई
भीमाशंकर परिसरातील जंगलं आणि डोंगररांगा पर्यावरणदृष्ट्या अत्यंत नाजूक आहेत.त्यामुळे अशा प्रकारच्या वनव्यांमुळे केवळ झाडांचे नुकसान होत नाही तर अनेक प्रजाती नामशेष होण्याच्या धोक्यात येतात.या पार्श्वभूमीवर वणवे लावणाऱ्या समाजकंटकांवर कठोर कारवाई करण्याची गरज व्यक्त होत आहे.तसेच,ग्रामस्थांमध्ये जनजागृती करून गैरसमज दूर करणे आणि वनसंवर्धनासाठी सामूहिक प्रयत्न करणे अत्यावश्यक असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.