अमोल सराफ, प्रतिनिधी
Buldhana Crime News : खामगाव शहरातील सुटाळा खुर्द परिसरात एका व्यक्तीवर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी खामगाव शहर पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुटाळपुरा खामगाव येथील किशोर काशीराम चोपडे (49) यांनी खामगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून पांडुरंग नारायण बोचरे,अजय पांडुरंग चोचरे,गोपाल पांडुरंग बोचरे (सर्व रा.सुटाळा खुर्द)तसेच दिपाली किशोर चोपडे (रा.सुटाळपुरा) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार,तक्रारदार किशोर चोपडे यांनी स्वतःचे घर विकून मिळालेली जवळपास 44 लाख रुपयांची रकम सासरच्या मंडळींना दिली होती. त्याबदल्यात त्यांना नवीन घर देण्याचे आश्वासन देण्यात आले होते.मात्र,काही दिवसांपासून आरोपीकडून त्रास होत असल्याने चोपडे हे आई-वडिलांकडे राहत होते. दरम्यान,पत्नीने त्यांच्यासोबत राहण्यास नकार देत घटस्फोटाची मागणी केल्याने कौटुंबिक वाद आणखी तीव्र झाला होता.
नक्की वाचा >> Baramati News: सुनेत्रा पवारांचा ऐतिहासिक विजय, पण 'त्या' बॅनरने अनेकांची झोप उडवली, "अजितदादा पवार.."
"तुला जिवंत सोडणार नाही"
2 मे 2026 रोजी दुपारी 1.30 ते 2.45 वाजण्याच्या सुमारास पत्नीला भेटण्यासाठी सुटाळा खुर्द येथे गेले असता आरोपीसोबत त्यांचा वाद झाला.वादाचे रूपांतर मारहाणीत झाले. आरोपीनी शिवीगाळ करत तक्रारदाराला मारहाण केली. तसेच "तुला जिवंत सोडणार नाही" अशी धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे. त्यानंतर आरोपी गोपाल बोचरे यांनी घरातून पेट्रोलची बाटली आणली.
नक्की वाचा >> Vijay Thalapathy Net Worth: देशातील राजकारणात फक्त विजय थलापतीची चर्चा, स्टार अभिनेत्याची एकूण संपत्ती किती?
इतर आरोपींनी तक्रारदाराला पकडून ठेवलं आणि त्यांच्यावर पेट्रोल ओतून त्यांना जाळण्याचा प्रयत्न केला,असा गंभीर आरोप करण्यात आला आहे. घटनेनंतर जखमी अवस्थेतील व्यक्तीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी खामगाव शहर पोलीस ठाण्यात अप.क्र. 251/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम 109,351(3),352 आणि 3(5)अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विनोद खांबलकर करीत आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world