एका महिन्यात एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू, नक्की काय घडलं?

एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. धक्कादायक म्हणजे हे चारही जणांचे मृत्यू एकाच महिन्यात लागोपाठ झाले आहेत.

Advertisement
Read Time: 2 mins
नाशिक:

नाशिकच्या वासननगर परिसरात मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. इथे राहणाऱ्या एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. धक्कादायक म्हणजे हे चारही जणांचे मृत्यू एकाच महिन्यात लागोपाठ झाले आहेत. यात पती, पत्नी आणि दोन मुलांचा समावेश आहे. या घटनेनंतर हळहळ व्यक्त होत आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

नाशिकच्या वासननगर परिसरात उमा पॅलेस अपार्टमेंट आहे. यात तुषार महाजन हे आपली पत्नी स्वाती, एक मुलगा कार्तिक आणि मुलगी हर्षदा बरोबर राहात होते. तुषार यांच्या मोठ्या भावाचा मृत्यू झाल्यानंतर त्यांनी त्यांच्या वहिनी बरोबरच म्हणजे स्वाती यांच्या बरोबर लग्न करत कुटुंब सांभाळले. शिवाय दोन्ही मुलांची जबाबदारी घेतली. गेल्या महिन्या 18 मे ला मुलगी हर्षदाला ताप आला होता. त्या तापाने तिचा मृत्यू झाला. तीच्या मृत्यूचा धक्का आई स्वातीला बसला. मुलीच्या जाण्याचे दुख: तीला सहन झाले नाही. मुलीच्या तेराव्या दिवशीच म्हणजे 31 मे ला स्वाती महाजन यांचाही मृत्यू झाला.

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - 'काही नेते रात्री भाजप नेत्यांना भेटून मॅनेज होतात' रोहित पवारांचा गौप्यस्फोट

घरात एका पाठोपाठ झालेल्या दोन मृत्यूने तुषार महाजन आणि त्यांचा मुलगा कार्तिक हादरून गेले होते. ऐवढे मोठे संकट आपल्यावर कसे कोसळे या विवंचनेत ते होते. हे दोघेही एकटे असल्याने तुषार यांचे भाचे हर्षल चौधरी हे नेहमी या दोघांची विचारपूस करण्यासाठी येत होते. त्यांना भेटत होते. त्यांच्याशी बोलून त्यांचे सांत्वनही करत होते. 17 जून ला हर्षलने तुषार यांच्या बरोबर संपर्क केला. पण कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर हर्षल यांनी तुषार यांचे घर गाठले. घरा जावून पाहतो तर त्यांच्या समोर तुषार आणि त्यांचा मुलगा कार्तिक हे दोघेही बेशुद्ध अवस्थेत पडलेले दिसले. त्यांना तातडीने रूग्णालयात हलवण्यात आले. मात्र तिथेच त्यांना मृत घोषीत करण्यात आले. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - अभिषेक बच्चननं मुंबईत खरेदी केले 6 फ्लॅट, किंमत वाचून बसेल धक्का

या दोघांचा मृत्यू नेमका कशा मुळे झाला हे शेवट पर्यंत समजू शकले नाही. मात्र एका महिन्यात एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. संपुर्ण कुटुंब बघता बघता काळाच्या पडद्या आड गेलं. जिवनाची नवी सुरूवात केलेल्या या कुटुंबाचा शेवट असा होईल असे कुणी स्वप्नातही पाहीले नसेल. 

Advertisement