जाहिरात
This Article is From Jun 19, 2024

अभिषेक बच्चननं मुंबईत खरेदी केले 6 फ्लॅट, किंमत वाचून बसेल धक्का

Abhishek Bachchan Property फिल्मी परिवाराशी संबंधित कलाकार हे प्रोडक्शन हाऊस किंवा अन्य गोष्टींवर पैसा लावताना दिसतात. पण, अभिनेता अभिषेक बच्चननं प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक केली आहे.

अभिषेक बच्चननं मुंबईत खरेदी केले 6 फ्लॅट, किंमत वाचून बसेल धक्का
अभिषेक बच्चननं खरेदी केले 6 फ्लॅट
मुंबई:

फिल्मी परिवाराशी संबंधित कलाकार हे प्रोडक्शन हाऊस किंवा अन्य गोष्टींवर पैसा लावताना दिसतात. पण, अभिनेता अभिषेक बच्चननं चित्रपटांमध्ये पैशांची गुंतवणूक करण्याच्या ऐवजी प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक केली आहे. एका रिपोर्टनुसार अभिषेकनं मुंबईतील बोरिवली भागात 6 फ्लॅट्स खरेदी केले आहेत. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

हिंदुस्थान टाईम्सच्या रिपोर्टनुसार, अभिषेक बच्चननं बोरिवलीमधील ओबेरॉय स्काय सिटी प्रोजेक्टमध्ये 6 फ्लॅट्स खरेदी केले आहेत. त्यांची किंमत 15 कोटी 42 लाख रुपये आहे. या रिपोर्टनुसार  31,498 रुपये प्रती चौरस फूट किंमतीवर एकूण 4,894 चौरस फूट रेरा कार्पेटची अभिषेकनं खरेदी केलीय. बोरिवली ईस्टमधील वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेच्या बाजूला असलेल्या या इमारतीमधील 57 व्या मजल्यावर हे 6 फ्लॅट आहेत. त्यामध्ये 10 कार पार्किंगचीही सोय आहे. 

अभिषेकनं खरेदी केलेल्या 6 फ्लॅटची किंमत काय आहे? त्याची माहिती देखील या रिपोर्टमध्ये देण्यात आलीय. त्यानुसार 1,101 चौरस फुटाचा पहिल्या फ्लॅटची किंमत 3 कोटी 42 लाख आहे. दुसरा आणि तिसरा फ्लॅट 252 चौरस फुट असून त्याची किंमत 79 लाख, चौथा फ्लॅट 1,101 चौरस फूट असून त्याची किंमत 3 कोटी 52 लाख आहे. पाचवा 1,094 चौरस फूटाचा फ्लॅटनं अभिषेकनं 3 कोटी 39 लाखांना खरेदी केलाय. तर सहाव्या फ्लॅटची किंमतही 3 कोटी 39 लाख आहे. 

( नक्की वाचा : सिनेमा किंवा डान्स नाही तर 'या' माध्यमातून होते सनी लियोनची कमाई, वाचा 115 कोटींच्या संपत्तीचं रहस्य )
 

अभिषेकनं प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करण्याची ही पहिली घटना नाही. त्यानं यापूर्वी 2021 साली ओबेरॉय रियल्टीमधील एक फ्लॅट 45 कोटी 75 लाखांना विकला होता. चित्रपटांबद्दल बोलायचं झालं तर अभिषेक यापूर्वी घूमर या सिनेमात दिसला होता. हा सिनेमा ओटीटीवर प्रदर्शित झाला होता. 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com